Adani Group's stake in NDTV: भारतातील आघाडीच्या वृत्त वाहिन्यांपैकी(News channel) एक असलेल्या न्यू दिल्ली टेलिव्हीजन लिमिटेड (NDTV) चे संपूर्ण मालकी हक्क उद्योजक गौतम अदानी(Gautam Adani) यांना प्राप्त झाले आहेत असे म्हणायला आता हरकत नाही. तुम्हाला माहित आहे का? ‘एनडीटीव्ही(NDTV)’ने शुक्रवारी बाजार मंचांना दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूहाची ‘एनडीटीव्ही(NDTV)’मधील हिस्सेदारीआता 64.71 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.
किती टक्के हिस्सेदारी खरेदी केली?
‘एनडीटीव्ही(NDTV)’ने शुक्रवारी बाजार मंचांना दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूहाची ‘एनडीटीव्ही(NDTV)’मधील हिस्सेदारी आता 64.71 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. अदानी समूहाने ‘NDTV’मधील बहुतांश भागभांडवली हिस्सेदारी खरेदी करत जवळपास संपूर्ण मालकी हक्क मिळविला आहे. एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणव रॉय(Pranav Roy) व त्यांची पत्नी राधिका रॉय(Radhika Roy) व अन्य प्रवर्तकांकडील समभाग 17 टक्के अधिक अधिमूल्य देऊन अदानी समूहाने खरेदी केला आहे.
भागधारकांना 17 टक्के अधिक अधिमूल्य
अदानी समूहापैकी 3 कंपन्यांनी चालू वर्षांत ऑगस्ट महिन्यामध्ये ‘न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड’ अर्थात एनडीटीव्ही(NDTV) या टेलिव्हिजन वाहिनीमधील 29.18 टक्के भागभांडवलाच्या अप्रत्यक्षरीत्या अधिग्रहण केले आहे. त्यांनतर अदानी समूहाने(Adani Group) गेल्या महिन्यात आणखी काही हिस्सेदारी विकत घेण्यासाठी भागधारकांपुढे ओपन ऑफर ठेवली होती. अदानी समूहाने रॉय दाम्पत्याकडील उर्वरित 32.26 टक्के हिस्सेदारीपैकी 27.26 टक्के हिस्सेदारी 342.65 रुपये प्रति समभाग दराने अदानी समूहाने खरेदी केली आहे. याबदल्यात रॉय यांना 602 कोटी रुपये देण्यात आले असून अदानी समूहाने हिस्सेदारी थेट विकत घेण्यासाठी त्यांच्या विद्यमान भागधारकांपुढे ठेवलेल्या 292 रुपये या प्रस्तावित किमतीपेक्षा 17 टक्के अधिक अधिमूल्य देण्यात आले आहे.