झोमॅटो (Zomato Inc) या अन्न आणि खाद्यपदार्थांच्या ऑनलाईन ऑर्डर (Online Food Delivery Platform) घेणाऱ्या कंपनीने 2022 वर्षाला गुडबाय (Goof Bye 2022) करताना त्यांच्या धंद्यातली काही सिक्रेट्स सांगितली आहेत. म्हणजे कुठल्या ऑर्डरमधून आणि कुणाकडून कंपनीला सर्वाधिक नफा झाला हेच त्यांनी या छोटेखानी अहवालात सांगितलंय. आकर्षक कॅचलाईन देऊन हा अहवाल ट्विटरवर त्यांनी प्रसिद्ध केलाय. त्यातून आपल्यालाही मजेशीर माहिती मिळते.
झोमॅटोच्या एका इन्स्टाग्राम पोस्टची कॅचलाईन आहे. ‘ट्विटर कंपनीपेक्षा ही ऑर्डर फक्त 36,42,17,44,48,38 रुपयांनी कमी आहे!’ अशी भन्नाट कॅचलाईन असलेली ही ऑर्डर आहे पुण्याच्या तेजसने दिलेली. तेजसने वर्षभरात झोमॅटोला तब्बल 28 लाख रुपयांच्या ऑर्डर दिल्या.
म्हणूनच तुम्हाला विचारलं, ‘झोमॅटोवर तुम्ही वर्षभरात किती पैसे खर्च केले?’ ऑर्डरच्या बाबतीत तेजसच्या मागोमाग नंबर लागतो दिल्लीच्या अंकुरचा. त्याने वर्षभरात 3,300 ऑर्डर झोमॅटोला दिल्या. तर राहुल नावाच्या एका ग्राहकाने वर्षभरात 1098 केक झोमॅटोवर ऑर्डर केले.
याशिवाय एका ऑर्डरचा अंदाज घ्यायचा झाला तर वर्षभरातली सगळ्यात मोठी ऑर्डर होती पिझ्झाची. बंगळुरूमध्ये एका तरुणाने एकावेळी 25,000 रुपयांचे पिझ्झे मागवले.
झोमॅटोने आपल्या नेहमीच्या ग्राहकांना काही सवलतीही दिल्या. आणि त्याचा सर्वाधिक लाभ घेणारा ग्राहक होता रविवर. त्याने वर्षभरात तब्बल 6,96,000 लाख रुपयांची सवलत झोमॅटोकडून मिळवली. म्हणजे त्यासाठी प्रत्यक्ष खर्च किती केला असेल याचा तुम्ही फक्त अंदाजच बांधू शकता.
या अहवालात झोमॅटो कंपनीने यश नावाच्या एका ग्राहकाचे विशेष आभार मानले आहेत. सुरतच्या यशने आपल्या प्रत्येक ऑर्डर नंतर चॅट मेसेजवर कंपनी आणि त्याच्यापर्यंत अन्नपदार्थ पोहोचवणाऱ्या माणसाला थँक यूचा मेसेज पाठवला. नवीन वर्षी यशकडून ही गोष्ट तुम्ही शिकू शकता!
सगळ्यात जास्त ऑर्डर कुठल्या पदार्थासाठी आल्या? अर्थातच बिर्याणीसाठी. झोमॅटोवर दर मिनिटाला 186 बिर्याणीच्या ऑर्डर होत्या. झोमॅटोची प्रतिस्पर्धी कंपनी स्विगीनेही डिसेंबरच्या मध्यावर त्यांच्याकडेही बिर्याणीला सर्वाधिक मागणी असल्याचं स्पष्ट केलं होतं.