Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

'झोमॅटो'चा शेअर कोसळला! खरेदीची संधी की धोक्याचा इशारा?

shares zomato share market

झोमॅटोचा शेअर 'आयपीओ' योजनेपासून चर्चेत आला होता. (Zomato IPO) झोमॅटोचे अवाजवी बाजार मूल्य, शेअरची किंमत आणि शेअरची नोंदणी यामुळे झोमॅटोचा आयपीओ चांगलाच गाजला होता.

झोमॅटोच्या शेअर किमतीत आज सोमवारी 25 जुलै 2022 रोजी मोठी घसरण झाली. सकाळच्या सत्रात बाजार सुरु होताच झोमॅटोचा शेअर 14 टक्क्यांपर्यंत घसरला होता आणि तो 46 रुपयांपर्यंत खाली आला. या पडझडीने शेअरने 52 आठवड्यांतील नीचांकी पातळी गाठली होती. दिवसअखेर बाजार बंद होताना तो 47.55 रुपयांच्या पातळीवर स्थिरावला. (Zomato Share hits 52 week low today)

ZOMATO SHARE PRICE 25 JULY 2022
Source:Rediffmoney.com                    

झोमॅटोचा शेअर 'आयपीओ' योजनेपासून चर्चेत आला होता. (Zomato IPO) झोमॅटोचे अवाजवी बाजार मूल्य, शेअरची किंमत आणि शेअरची नोंदणी यामुळे झोमॅटोचा आयपीओ चांगलाच गाजला होता. मात्र शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग झाल्यानंतर 4 महिने हा शेअर तेजीत होता. पण त्यानंतर मात्र या शेअरने गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान केले.

मागील वर्षभरात झोमॅटोचा शेअर तब्बल 65 टक्क्यांनी घसरला. नोव्हेंबर 2021 मध्ये झोमॅटोने 169.10 रुपयांची सार्वकालीन उच्चांकी पातळी गाठली होती. तेव्हापासून तो तब्बल 73 टक्क्यांनी कोसळला आहे. ज्याचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसला. आजच्या घसरणीने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांच्या मनात धडकी भरली. हा शेअर आणखी कोसळणार का? असा प्रश्न गुंतवणूकदारांना सतावत आहे. 

शेअर मार्केटमधील विश्लेषक मात्र झोमॅटो शेअरबाबत वेगवेगळी मते व्यक्त करत आहेत. काहींच्या मते झोमॅटोमधील गुंतवणुकीचा एक वर्षाचा लॉक इन कालावधी 23 जुलै 2022 रोजी पूर्ण झाल्याने बहुतांश बड्या गुंतवणूकदारांनी या शेअर्समधून बाहेर पडणे पसंत केलं आहे. जवळपास 613 कोटी शेअर हे लॉक इन कालावधीमध्ये होते. परिणामी बाजारात झोमॅटोच्या शेअरची चौफेर विक्री दिसून आली. काही सल्लागारांच्या मते जे गुंतवणूकदार अजूनही नुकसान सोसून या शेअरमध्ये आहेत त्यांनी आणखी काही काळ थांबावे. एकदा का हा विक्रीचा दबाव निवळला कि शेअर पुन्हा सावरेल, असे आवाहन या गुंतवणूक सल्लागारांनी केलं आहे. 
जुलै महिन्याच्या सुरुवातीला झोमॅटोच्या शेअरमध्ये मोठी ट्रेडिंग दिसून आली होती. एडलवाईज या ब्रोकरेज संस्थेने झोमॅटोचे मूल्यांकन गुंतवणुकीच्या दृष्टीने आकर्षक असल्याचे म्हटले होते. झोमॅटोने ब्लिंकिट या कंपनीची खरेदी केली होती. हे अधिग्रहण भविष्यात झोमॅटोची वितरण साखळीच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.   काही गुंतवणूक विश्लेषकांच्या मते केवळ किंमतीत प्रचंड घसरण झाली आहे, म्हणून हा शेअर खरेदी करावा, असा दृष्टीकोन घातक ठरेल. झोमॅटोची मागील तिमाहीची कामगिरी गुंतवणूकदारांनी पाहणे आवश्यक आहे. यात सातत्याने होत असलेली घसरण पाहता झोमॅटोचा शेअर ४२ रुपयांची पातळी देखील तोडू शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यामुळे या पातळीवर खरेदी टाळावी, असा सल्ला देण्यात आला आहे. 

पदार्पणात गुंतवणूकदारांना केलं मालामल

  • झोमॅटोची प्रारंभिक समभाग विक्री योजना (आयपीओ) जुलै 2021 मध्ये भांडवली बाजारात धडकली होती. 
  • 23 जुलै 2021 रोजी झोमॅटोचा शेअर इश्यू प्राईसच्या तुलनेत 51 टक्के वाढीसह सूचीबद्ध झाला होता.
  • या धमाकेदार लिस्टींगने गुंतवणूकदार मालामाल झाले होते. झोमॅटोचा प्राईस ब्रॅण्ड प्रती शेअर 72 ते 76 रुपये एवढा निश्चित केला होता. 
  • मात्र प्रत्यक्षात बीएसईमध्ये (BSE) झोमॅटोचा शेअर 115 रुपयांना आणि राष्ट्रीय शेअर मार्केट (NSE) तो 116 रुपयांना लिस्ट झाला. 
  • झोमॅटो कंपनीनं समभाग विक्रीतून तब्बल 9,375 कोटींचे भांडवल उभारले होते. 
  • नोंदणीच्याच दिवशी आलेल्या तेजीच्या रॅलीने झोमॅटोचे बाजार भांडवल एक लाख कोटींपार गेले होते.

झोमॅटोचे शेअर मूल्य (25 जुलै 2022 रोजी) 

zomato share price 25 july