Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India’s Favourite Dish : Biryani ठरलाय भारतीयांचा सर्वाधिक पसंतीचा अन्नपदार्थ

Biryani

सलग सात वर्षं बिर्याणी हा अन्नपदार्थ भारतीयांचा सगळ्यात आवडता अन्नपदार्थ ठरला आहे. स्विगी, झोमॅटे यासारख्या ऑनलाईन साईट्सवर सगळ्यात जास्त मागणी बिर्याणीलाच होती. आणि एके दिवशी तर पुण्यातून 71,000 रुपयांची एक मोठ्ठी ऑर्डर बिर्याणीसाठी आली होती.

बिर्याणी (Biryani) या हैद्राबादची (Hyderabad) खासियत असलेल्या अन्नपदार्थाविषयी तुम्हाला नव्याने सांगायला नको. निझामांच्या (Nizam Rule) काळात हा पदार्थ भारतात आला. आणि पुढे देशभर पसरला आणि रुढही झाला. चिकन बिर्याणी (Chicken Biryani) आणि मटन बिर्याणीबरोबरच (Muton Biryani) शाकाहारी लोकांसाठी (Vegetarians) पनीर बिर्याणीही (Paneer Biryani) लोकांनी आनंदाने फस्त केली. दक्षिण भारतीय राज्यांमध्ये आणि उत्तर भारतात तर बिर्याणी (Biryani) खासी लोकप्रिय.     

आणि ऑनलाईन ऑर्डरचा (Online Order) आढावा घेतला तर 2022 मध्ये सलग सातव्यांदा बिर्याणीलाच सर्वाधिक मागणी असल्याचं सिद्ध झालंय. स्विगी कंपनीला (Swiggy Inc) तर दर मिनिटामागे 137 ऑर्डर येत होत्या. आणि बिर्याणी खालोखाल लोकांची पसंती मसाला डोसा आणि चिकन फ्राईड राईसला होती. स्नॅक्स विभागात सामोशाला सर्वाधिक पसंती होती. आणि खालोखाल पॉपकॉर्न आणि पावभाजीचा क्रमांक लागतो.     

स्विगी ही ऑनलाईन ऑर्डर घेऊन तुम्ही मागितलेले अन्नपदार्थ घरपोच पोहोचवणारी कंपनी दरवर्षीच्या ऑनलाईन ऑर्डर ट्रॅक करून आपला अहवाल तयार करत असते. आलेल्या ऑर्डरची सरासरी काढून ते आकडेवारी प्रसिद्ध करतात. यावर्षीचा अहवाल त्यांनी नुकताच सादर केला आहे. आणि यामध्ये सणासुदीला बिर्याणीच्या मोठ्या ऑर्डर मिळत असल्याचं स्पष्ट झालंय. स्विगीला दिवाळीत बंगळुरूतल्या एका कंपनीकडून 75,338 रुपयांची एक ऑर्डर मिळाली. तर पुण्यातून 31,000 रुपयांची ऑर्डर मिळाली होती.     

2022 मध्ये भारतात एक लाख नवीन हॉटेल्स किंवा क्लाऊड किचन स्टोर ऑनलाईन पोर्टलबरोबर जोडले गेले. म्हणजे ऑनलाईन अन्नपदार्थ मागवण्याचा ट्रेंड भारतात वाढलेला आहे.     

2022 मधली बिर्याणीची ऑनलाईन उलाढाल सेकंदाला 137 बिर्याणीच्या ऑर्डर…म्हणजे वर्षभरात एकट्या बिर्याणीमध्येच 50 अब्ज रुपयांची उलाढाल झाल्याचं स्विगीच्या अहवालात नमूद करण्यात आलंय.     

भारतीयांना गोड पदार्थही आवडतात असं स्विगीच्या यादीत दिसतंय. आणि गोड पदार्थांमध्ये सर्वाधिक मागणी गुलाबजामला होती. गुलाबजामसाठी ऑनलाईन ऑर्डर तब्बल 27 होत्या. तर रसमलाईसाठी 16 लाख ऑर्डर होत्या. त्या खालोखाल चोको लाव्हा केक मागवला गेला. आईसक्रीममध्ये चोको चिप्स, अल्फान्सो मँगो आणि टेंडर कोकोनट या फ्लेवरना सर्वाधिक पसंती होती.