Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

'Bank Account' शी मोबाईल नंबर लिंक करणं का महत्त्वाचं आहे? जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Mobile Link to Bank Account

Bank Account: RBI ने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही म्हटले आहे की,” ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी आणि ट्रान्सझॅक्शन सुधारण्यासाठी बँकेशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस अलर्ट सुविधा चालू ठेवणे आवश्यक आहे.

Bank Account: आजकाल बँकेशी(Bank) संबंधित बहुतेक कामे मोबाईलवरूनच(Mobile) केली जातात कारण सध्याच्या काळात प्रत्येकाचा मोबाईल नंबर बँकेच्या खात्याशी जोडला गेला असतो. ज्याच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट(Online Payment), UPI, मनी ट्रान्सफर(Money Transfer) इत्यादी गोष्टी अगदी सहजपणे केल्या जाऊ शकतात . जर आपल्या बँकेच्या खात्यातील रजिस्टर्ड मोबाईल नंबर(Register Mobile Number) हरवल्यास आता तो सहजपणे बदलताही येतो. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जवळपास सर्वच बँकांकडून बँक खात्याशी मोबाईल क्रमांक लिंक करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. पण हा मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक कारण का महत्त्वाचं आहे चला जाणून घेऊयात.

मोबाईल नंबर लिंक करणं का महत्वाचे आहे?

RBI ने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही म्हटले आहे की,” ऑनलाईन फसवणूक(Online fraud) टाळण्यासाठी आणि ट्रान्सझॅक्शन(Transaction) सुधारण्यासाठी बँकेशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस अलर्ट(SMS Alert) सुविधा चालू ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आरबीआयकडून ग्राहकांना ई-मेल आयडी(E-mail ID) देखील अपडेट करण्याच्या सूचना वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत. आता ई-मेलमध्ये उत्तर देण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे, ज्याद्वारे फसवणुकीची थेट तक्रार ग्राहकांना करता येणार आहे. याआधी बँकेकडून येणाऱ्या ईमेलमध्ये उत्तर देण्याचा पर्याय उपलब्ध नव्हता.

मोबाईल नंबर लिंक नसल्यास?

जर आपल्याला ऑनलाईन ट्रान्सझॅक्शन(Online Transaction) करायचे असेल तर आपला मोबाईल नंबर बँकेच्या खात्याशी लिंक करणे बंधनकारक आहे. RBI च्या सूचनेनुसार ज्या लोकांनी आपले बँक खाते मोबाईल क्रमांकाशी लिंक केलेले नाही, त्यांना यापुढे ऑनलाईन बँकिंगचा वापर करता येणार नाही. तसेच, ऑनलाईन फसवणुकीबाबत RBI चे म्हणणे आहे की, जर आपण फसवणुकीबाबत 3 दिवसांच्या आत बँकेमध्ये तक्रार दाखल केली तर पुढील 10 दिवसांत खात्यामध्ये पैसे परत केले जातील.

बँक खात्याशी संलग्न असेलला मोबाईल नंबर कसा बदलावा ?

आता बँक खात्याशी संलग्न असेलला मोबाईल नंबर घरबसल्या सहजपणे बदलता येणार आहे. आजकाल बहुतेक बँकांकडून ऑनलाईनच ही सुविधा दिली जात आहे. ज्यामुळे खात्यामध्ये ऑनलाईन लॉग इन करून हे बदलता येईल. याशिवाय, ज्या बँकेत आपले खाते आहे, त्या बँकेच्या एटीएममधूनही मोबाईल नंबर बदलता येणार आहे.  आपल्या बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊनही खात्याशी लिंक केलेला मोबाईल नंबर अपडेट करता येणार आहे.