Auto Expo 2023: ऑटो एक्स्पोच्या(Auto Expo) या दोन दिवसात देशातील आणि विदेशातील अनेक कंपन्यांनी त्यांचे नवनवीन मॉडेल्स(Models) लाँच केले आहेत. पहिला दिवस टाटा(Tata) आणि मारुती(Maruti) या कंपन्यांनी गाजविला. याशिवाय एमजीने(MG) देखील ईव्ही आणि नवीन हॅरिअर लाँच केली. आज पण बऱ्याच कंपन्या त्यांची वाहने, तंत्रज्ञान जगापुढे आणणार आहेत. याच ऑटो एक्स्पोमध्ये(Auto Expo) औपचारिक मार्गदर्शन करताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी 'लोक मला दोषी ठरवतायेत' असं विधान केल्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. गडकरी असं का म्हणाले चला जाणून घेऊयात.
नितीन गडकरी असं का म्हणाले?
गुरुवारी(12 जानेवारी) ऑटो एक्स्पो(Auto Expo) 2023 चे औपचारिक उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी केले. यावेळी त्यांनी 'लोक मला दोषी ठरवतायत' असं विधान केलं. पण या विधानापाठीमागे त्यांनी लोकांना रस्ता सुरक्षेवर लक्ष द्यायला हवं असं सांगितलं. भलेही मी रस्ते बनवत असलो तरीही त्या रस्त्याची आणि तुमची सुरक्षा हे सर्वस्वी तुमचेही कर्तव्य आहे. बऱ्याच जणांचे असे म्हणणे आहे की, रस्त्या न बनल्यामुळे अपघात वाढत चालले आहेत. आपण जर नीट अभ्यास केला तर लक्षात येईल की, 18 ते 34 वयातील तरुणांचे अपघातात सर्वाधिक मृत्यू होत आहेत. त्यामुळे तुम्ही वाहतुकीचे नियम पाळा(Road Safety Rule) व रस्त्याच्या सुरक्षेवर लक्ष द्या आणि सर्वांना त्यासंदर्भात सुशिक्षित करा. आपल्या देशात 2024 पर्यंत अमेरिकेच्या तोडीस तोड रस्ते तयार होतील असंही ते यावेळी म्हणाले.
औपचारिक भाषणातील इतर मुद्दे कोणते होते?
यावेळच्या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला जसे की, वाढते प्रदूषण आणि भारतात वाढत जाणारी इलेक्ट्रिकल वाहनांची मागणी आणि निर्मिती, गडकरी 2004 पासून फ्लेक्स इंधनाचे पाहत असलेले स्वप्न, वाहनाही निर्मिती करताना रिसायकलिंग करून कच्चा माल कसा मिळेल यासाठी मार्गदर्शन, याशिवाय इथेनॉलचे सद्यस्थितीतील दर आणि भविष्यात बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यासोबत केला जाणारा खरेदी करार अशा अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. ऑटो एक्स्पोमध्ये(Auto Expo) सामील झालेल्या सर्व कंपन्यांचे त्यांनी स्वागत केले.