Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Auto Expo 2023 FAQ: जाणून घ्या ऑटो एक्पो 2023 चे ठिकाण, वेळ, तिकीट आणि इतर माहिती

Auto Expo 2023 FAQ

Auto Expo 2023 FAQ: वाहन उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ऑटो एक्स्पो बुधवार 11 जानेवारी 2023 पासून उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडातल्या इंडिया एक्स्पो मार्ट येथे आयोजित केले जाणार आहे. या व्यापारी परिषदेला कार उत्पादक, बाइक उत्पादक कंपन्या, सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्या, ईलेक्ट्रिक वाहन उत्पादक यांच्यासह काही देशांची स्वतंत्र दालने आहेत.

तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर वाहन उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ऑटो एक्स्पोचे पुन्हा एकदा आयोजन करण्यात आले आहे. येत्या बुधवारी 11 जानेवारी 2023 पासून उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडातल्या इंडिया एक्स्पो मार्ट येथे ऑटो एक्स्पो होणार आहे. या व्यापारी परिषदेला कार उत्पादक, बाइक उत्पादक कंपन्या, सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्या, ईलेक्ट्रिक वाहन उत्पादक यांच्यासह काही देशांची स्वतंत्र दालने आहेत. Auto Expo 2023 सर्वसाधारण विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे जाणून घेऊया.

Table of contents [Show]

भारतात ऑटो एक्स्पो 2023 चे कोठे आयोजन करण्यात आले आहे?  (Where is the Auto Expo 2023 happening in India?)

आगामी ऑटो एक्स्पो - दि मोटार शो उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडातल्या इंडिया एक्स्पो मार्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. तर दिल्लीमधील प्रगती मैदानावर ऑटो एक्स्पो कंपोनंनट्स शोचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाच्या ऑटो एक्स्पो 2023 ची तारिख काय? What are the dates for Auto Expo this year?

यंदाचा ऑटो एक्स्पो मोटार शो 11 जानेवारी ते 18 जानेवारी 2023 दरम्यान होणार आहे. यातील सुरुवातीचे दोन दिवस 11 आणि 12 जानेवारी 2023 हे माध्यमांसाछी राखीव आहेत. सर्वसाधारण वाहन प्रेमींना 13 ते 18 जानेवारी दरम्यान ऑटो एक्स्पोसाठी प्रवेश दिला जाणार आहे.

ऑटो एक्स्पो पाहण्यासाठी वेळ काय आहे?What are the timings of the show?

ऑटो एक्स्पोसाठी आठवड्याच्या दिवसांकरिता सकाळी 11 ते संध्याकाळी 7 ही वेळ आहे. विकेंडमध्ये सकाळी 11 ते 8 या वेळेत ऑटो एक्स्पोसाठी प्रवेध दिला जाईल. शेवटच्या दिवशी म्हणजेच 18 जानेवारी रोजी ऑटो एक्स्पो सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खुला राहणार आहे.

ऑटो एक्स्पो भरलेल्या इंडिया एक्स्पो मार्ट या स्थळी कसे जाता येईल? (How can one reach India Expo Mart?)

ग्रेटर नोएडामधील इंडिया एक्स्पो मार्ट या स्थळी वाहनाने किंवा मेट्रोने जाता येऊ शकते. नवी दिल्ली स्टेशनपासून इंडिया एक्स्पो मार्ट हे स्थळ 41 किमी इतके लांब आहे. सर्व मुख्य रस्ते आणि मेट्रो रेल्वे इंडिया एक्स्पो मार्टशी जोडलेले आहेत.

इंडिया एक्स्पो मार्टच्या सर्वात जवळचे मेट्रो स्टेशन कोणते? (Which is the nearest metro station to India Expo Mart?)

ज्या ठिकाणी ऑटो एक्स्पो 2023 चे आयोजन करण्यात आले आहे त्या इंडिया एक्स्पो मार्टच्या सर्वात जवळचे मेट्रो स्टेशन नॉलेज पार्क-2 हे आहे. दिल्ली एनसीआर परिक्षेत्रातून येणाऱ्या नागरिकांनी अॅक्वा मेट्रो लाईनचा वापर करावा. नोएडा सेक्टर 51 मधून थेट नॉलेज पार्क 2 ला मेट्रोने येता येते.

ऑटो एक्स्पो 2023 साठीच्या तिकिटांची किंमत काय? What is the ticket price for Auto Expo 2023?

यंदा ऑटो एक्स्पो 2023 साठी वेगवेगळ्या दिवशी तिकिटांची किंमत वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. 13 जानेवारीसाठी 750 रुपये , 14 आणि 15 जानेवारीसाठी 575 रुपये तिकिट दर असेल आणि त्यापुढे प्रत्येकी 350 रुपये तिकिट दर ठेवण्यात आला आहे. पाच वर्षांपर्यंत्या मुलांना ऑटो एक्स्पोमध्ये प्रवेश शुल्क नाही. ऑटो एक्स्पो 2023 ची तिकिटे ऑनलाइन बुकमायशो वर किंवा कार्यक्रम स्थळी खरेदी करता येतील.

ऑटो एक्स्पो 2023 साठी इंडिया एक्स्पो मार्ट येथे किती हॉल्स आणि गेट आहेत? How many halls and gates are there at India Expo Mart?

इंडिया एक्स्पो मार्ट येथे ऑटो एक्स्पोचे 14 हॉल्समध्ये आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय खानपान सेवेसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. या ठिकाणी एक्स्पोला प्रवेश करण्यासाठी तीन गेट आणि बाहेर पडण्यासाठी तीन गेट आहेत.

ऑटो एक्स्पो 2023 मध्यो कोणत्या कंपन्या सहभागी होणार आहेत? (Which car manufacturers are participating in the Auto Expo 2023?)

ऑटो एक्स्पो 2023 मध्ये सर्वच प्रमुख ऑटो कंपन्या सहभागी होणार आहेत. यात मारुती सुझुकी, ह्युंदाय मोटर, किया इंडिया, टोयोटा, टाटा मोटर्स, एम.जी मोटर्स, मर्सिडिज, बीएमडब्ल्यू या सारख्या कंपन्या आपली नवीन मॉडेल्स सादर करतील.