Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Auto expo 2023: कोणत्या ऑटोमोबाईल कंपन्या सहभागी होणार यासह डिटेल्स घ्या जाणून

Auto expo 2023

Image Source : www.autocarpro.in

Auto expo 2023 : ऑटो एक्स्पो हा भारतातील ऑटोमोबाईल जगतातील सर्वात मोठा कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. दर दोन वर्षांनी हा कार्यक्रम होतो. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम), यांच्याकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

ऑटो एक्स्पो  हा भारतातील ऑटोमोबाईल जगतातील सर्वात मोठा कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. दर दोन वर्षांनी हा कार्यक्रम होतो. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम), यांच्याकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

भारतीय ऑटोमोबाईल उत्पादन उद्योगातील ही सर्वात मोठी संस्था आहे. ऑटो एक्स्पोमध्ये विविध वाहन कंपन्या त्यांच्या नवीन कार, मोटरसायकल, स्कूटर, व्यावसायिक वाहने, ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान आणि बरेच काही याठिकाणी प्रदर्शित करत असतात. कोविड-19 च्या कारणामुळे  2022 मध्ये हा द्विवार्षिक ऑटोमोटिव्ह कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता  ऑटो एक्स्पो जानेवारी 2023 मध्ये पुन्हा एकदा आयोजित केले जाणार आहे.

येत्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये काही आकर्षक वाहने आणि अंतर्गत ज्वलन इंजिन आणि इतर मॉडेल्स प्रदर्शित होणार आहेत. 

Auto expo 2023 कुठे होणार आहे?

ऑटो एक्स्पो 2023 इव्हेंट मागील काही वेळेप्रमाणे इंडिया एक्स्पो मार्ट येथे आयोजित केला जाणार आहे. इंडिया एक्सपो मार्ट ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश येथे जेपी गोल्फ कोर्सजवळ याठिकाणी  आहे. यासोबतच दिल्लीतील प्रगती मैदानावर ऑटो एक्स्पो-कम्पोनंट शोचे आयोजन केले जाणार आहे. हे विशेषतः वाहन कंपोनंट उद्योगासाठी आयोजित करण्यात आलेले आहे.

Auto expo 2023 ची तारीख आणि वेळ

ऑटो एक्स्पो 2023 चा कार्यक्रम पुढील वर्षी 13 ते 18 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेला  आहे. 14 व 15 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 8 वाजेपर्यंत, 16 व 17 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 7 आणि 18 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत सर्वसामान्यांसाठी कार्यक्रमाच्या वेळा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. कार्यक्रमाच्या बंद होण्याच्या वेळेच्या एक तास अगोदर सार्वजनिक ठिकाणी प्रवेश बंद केला जाणार आहे.

इंडिया एक्स्पो मार्ट दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) च्या इतर भागांशी रस्ते आणि मेट्रो रेल्वे नेटवर्कच्या माध्यमातून चांगले जोडलेले आहे. हे आठ-लेन ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेद्वारे मध्य दिल्ली, नवी दिल्ली रेल्वे स्टेशन आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडले गेलेले आहे. याव्यतिरिक्त, मेट्रो रेल्वे आणि वैयक्तिक आणि सार्वजनिक वाहतुकीद्वारे हे ठिकाण सोईचे आहे. या ठिकाणी सुमारे 8 हजार वाहनांची पार्किंग क्षमता असल्याचा दावा केला जात आहे.

कोणते ऑटोमेकर्स एक्स्पोमध्ये येत आहेत ?

ऑटो एक्सपो 2023 मध्ये कार आणि दुचाकींची मोठ्या प्रमाणात  प्रदर्शित केली जाण्याची शक्यता  आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स, महिंद्रा, टोयोटा, किआ, एमजी, रेनॉल्ट आणि निसान सारख्या प्रमुख ऑटो कंपन्या  या कार्यक्रमात काही आकर्षक कार दाखवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मर्सिडीज-बेंझ, जग्वार लँड रोव्हर आणि बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी कार ब्रँड्स देखील या कार्यक्रमात सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

ऑटो एक्स्पो 2023 मध्ये अनेक मोठ्या ब्रँड्स आणि EV स्टार्टअप्सच्या काही मनोरंजक इलेक्ट्रिक कार देखील पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमात BYD India, Torque Motors, Okinawa Autotech, Hero Electric, Log9 Materials, ELMoto, Mater Motorworks, CE Info Systems, Sibros Technologies India, Omjay EV, Autoline E-Mobility, Hop Electric, Divot Motors, MTA ई-मोबिलिटी, इलेक्ट्रिक वाहन उत्पादक आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी तंत्रज्ञान मधील ग्रीव्हज कॉटन आणि ओमेगा सेकी मोबिलिटी सारखे मोठे प्लेयर देखील उपस्थित राहण्याची अपेक्षा केली जात आहे.

या कार्यक्रमात कार उत्पादक दुचाकी उत्पादकांना मात देऊ शकतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मोटोव्होल्ट, स्लेजहॅमर, डिव्होट, फुजियामा, एलएमएल, क्वांटम आणि अल्ट्राव्हायोलेट यासारख्या कंपन्या ऑटो एक्सपो 2023 मध्ये दिसण्याची शक्यता आहे.