गुगल (Google) लवकरच युट्यूबवर कोर्सेस, मल्टीपल लेक्चर, पीडीएफ अटॅचमेंट आदी फीचर भारत, युएसए आणि दक्षिण कोरियामध्ये लाँच केले जाणार आहे, असे दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या YouTube च्या Google for India या वार्षिक कार्यक्रमात साऊथ ईस्ट एशियाचे संचालक अजय विद्यासागर यांनी घोषित केले. युट्यूब (YouTube) हे जगातले सर्वात मोठे Education Platform आहे. मात्र या फीचरमुळे युट्यूब क्रिएटरना आणि शिक्षण घेणाऱ्यांना चांगला अनुभव मिळेल याद्वारे युट्यूब हे ऑनलाईन शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवू शकेल, असा विश्वास विद्यासागर यांनी व्यक्त केला.
कोणते फीचर YouTube वर पाहायला मिळतील?
कोर्सेस मार्फत युट्यूबवर creators साठी नवे monetization चे माध्यम उपलब्ध होणार आहे. जिथे एका विषयावर वाहिलेले multi-session video tutorials असतील. ज्यामुळे प्रेक्षक किंवा शिक्षण घेणाऱ्याला त्या विषयाची सर्व माहिती एकाच ठिकाणी, एकाच कोर्समध्ये उपलब्ध होईल. त्या कोर्ससाठी कोणत्या वेगळ्या माध्यमाकडे वळण्याची गरज भासणार नाही. या फीचरच्या मदतीने शिक्षण घेता येईल, कौशल्ये वाढवता येतील. यात क्रिएटर पीडीएफ, पीएनजी फाईलद्वारे नोट्स जोडू शकतात. सुरुवातील हे फीचर काही क्रिएटरपुरता आणि विषयांपुरता मर्यादीत असणार आहे.
अनेक युट्यूब क्रिएटर स्वत:चे कोर्सेस युट्यूबवर चालवतात. युट्यबूवरील व्हिडीओ मोफत असतात, मात्र त्या एडव्हान्स पेड कोर्सेस हे त्यांच्या वेबसाईटवर किंवा इतर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतात. युट्युबच्या नव्या फीचरमुळे क्रिएटरना कोणत्याही इतर प्लॅटफॉर्म किंवा वेबसाईटची गरज भासणार नाही. कोर्स लाईव्ह करण्यासाठी टूल्सची गरज भासणार नाही, तसेच विद्यार्थ्यांना युट्यूबवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर वळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार नाही. युट्युबच्या एकाच मंचावर सर्वकाही उपलब्ध होईल, असे युट्यूब मार्केटींग एक्स्पर्ट निकिता तिवारी यांनी सांगितले.
आरोग्याशी संबंधित निवडक क्रिएटर किंवा व्हिडीओसाठी विविध भारतीय भाषांमध्ये व्हिडीओचा मजकूर ऑटो डब होईल, असे फीचर लागू करणार आहे. AI अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून Aloud द्वारे ही ऑटो डबिंगची सेवा उपलब्ध होणार आहे. सध्या हे फीचर केवळ हॉस्पिटल, डॉक्टरपुरता मर्यादीत आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण माहिती सहजरित्या स्थानिक भाषेत उपलब्ध होत आहे. तसेच हे डबिंग किंवा ट्रान्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे. वैद्यकीय विषयक क्रिएटरना मिळणारे ऑटोडबचे एडव्हाटेंज, भविष्यात इतर क्रिएटरच्या व्हिडीओना लागू करण्यासाठी गुगलमार्फत विविध प्रयोग केले जात आहेत, असे विद्यासागर यांनी सांगितले.
लवकरच युट्यूबवर सर्च करण्यासाठी नेहमीच आपण टाईप करण्यासाह Voice Search करता येणार आहे. Google search engine वर उपलब्ध असलेले व्हॉईस सर्चचे फीचर हे आता युट्यूबवरही वापरता येणार आहे. यासह युट्यूब सर्चला अधिक बळकटी देण्यासाठी गुगल लेन्स टूलचा वापर युट्यूब सर्चमध्ये वापरत visual सर्च करण्याची संधी वापरकर्त्यांना मिळणार आहे. यात व्हिज्युअलसह महत्त्वाचे कीवर्ड जोडून सर्च करता येणार आहे. यामुळे एखादा विशिष्ट पॅटर्नचा ड्रेस, लोगो, आकृती असे काहीही शोधता येईल.
युट्यूब कोर्सेस, ऑटोडब, व्हॉईस आणि व्हिज्युअल सर्च आदींमुळे क्रिएटरच्या चॅनलवर ट्रॅफिक जास्त वाढेल आणि ज्यामुळे त्यांच्या इन्कमला फायदा होणार आहे. तसेच युट्यूबवरुन इतर प्लॅटफॉर्मवर जाणारा क्राऊड युट्यूबवरच राहण्यास सहाय्य मिळेल.तसेच युट्यूबवरील नागरिकांची विश्वासार्हता वाढण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत, असे तिवारी म्हणाल्या.