Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Google Cloud Storage: गुगल क्लाऊड स्टोरेज 1 TB पर्यंत मोफत मिळणार

Google Cloud Storage

गुगल वर्कस्पेस (Google Workspace) खातेधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. गुगलकडून 15 GB ऐवजी आता 1 TB स्टोरेज मोफत मिळणार आहे. ही सुविधा जगभरातील वर्कस्पेस खातेधारकांना मिळणार आहे. गुगल वर्कस्पेसमध्ये जीमेल, गुगल ड्राईव्ह, गुगल मीट, गुगल डॉक आणि कॅलेंडरचा समावेश होतो.

गुगल वर्कस्पेस (Google Workspace) खातेधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. गुगलकडून 15 GB ऐवजी आता 1 TB स्टोरेज मोफत मिळणार आहे. ही सुविधा जगभरातील वर्कस्पेस खातेधारकांना मिळणार आहे. गुगल वर्कस्पेसमध्ये जीमेल, गुगल ड्राईव्ह, गुगल मीट, गुगल डॉक आणि कॅलेंडरचा समावेश होतो. वैयक्तिक वर्कस्पेस खाते असणाऱ्यांनाच याचा फायदा मिळणार आहे. वर्कस्पेसची सुविधा कंपन्याही वापरतात त्यांना अतिरिक्त स्टोरेज मिळणार नाही.

व्हायरसपासून बचाव करण्यासाठी फिचर्स(Virus protection feature)

गुगल वर्कस्पेसमध्ये नव्या अपडेटनुसार १०० प्रकारच्या विविध फाइल्स स्टोअर करता येतील. सोबतच व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी ड्राइव्हमध्ये बिल्टइन मालवेअर प्रोटेक्शन फिचर आणण्यात आले आहे. त्यामुळे बनावट व्हायरस असलेल्या फाइल्सवर जरी तुम्ही क्लिक केले तरी स्पॅम आणि रॅनसमवेअरपासून तुमच्या कॉम्युटर आणि माहितीचे संरक्षण होईल. वर्कस्पेस खाते असणाऱ्यांना ही सुविधा मिळवण्यासाठी काहीही करावे लागणार नाही. अॅटोमॅटिक स्टोरेजमध्ये वाढ होईल, असे गुगलने म्हटले आहे.

जीमेलमधील फिचर्समध्ये सुधारणा (Google Gmail new feature)

एकापेक्षा जास्त व्यक्तींना मेल पाठवण्यासंबंधी हे फिचर आहे. अनेक व्यक्तींना एकच मेल पाठवायचा असल्यास 'मेल मर्ज' हे फिचर आणले आहे. एकच मेल अनेकांना पाठवल्याचे वापरकर्त्याच्या लगेच लक्षात येते. मात्र, मेल मर्ज फिचरमुळे वैयक्तिकृत मेल पाठवता येतील. जसे की हा मेल फक्त आपल्या एकट्याला पाठवला आहे, असे मेल रिसिव करणाऱ्या व्यक्तीला वाटेल. या सोबतच गुगल डॉकवरती इलेक्ट्रिक सही करता येईल.

क्रोम पासवर्ड फिचर (Chrome password Feature)

गुगलने नुकतेच क्रोम ब्राऊजरवरुन विविध संकेतस्थळांना लॉगइन करताना पास की हे फिचर आणण्याची घोषणा केली आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या खात्यामध्ये विना पासवर्ड आणि युजरनेमशिवाय लॉगइन करू शकता. त्यासाठी तुम्हाला लागेल फक्त पासकी जी तुमच्या मोबाईलवरही मिळू शकते. जसे तुम्ही पीन टाकून किंवा फिंगर प्रिंटने मोबाईलला लॉगइन करता अगदी तसेच तुम्ही कोणत्याही वेबसाइटवर लॉग इन करू शकता.