यूट्यूबवर व्हिडिओ तयार करून अपलोड करावेत आणि या माध्यमातून पैसे कामवावेत, अशी बऱ्याच जणांची इच्छा असते. आज यूट्यूबवर जेवढे viewers आहेत त्यापेक्षा जास्त क्रिएटर्स आहेत अस म्हटल तर अतिशयोक्ती होईल. पण वास्तव आणि यात फार अंतर आहे असेही नाही. ज्या सगळ्यांनी यू ट्यूबवर चॅनेल चालू केलंय त्यांना माहिती आहे की चॅनेल मॉनिटाइज करण्यासाठी सुरुवातीला किती कष्ट घ्यावे लागतात. हा मॉनिटायझेशन क्रायटेरिया पूर्ण करणे हे मोठे आव्हान असते. YouTube Channel मॉनिटाइज होण्यासाठी सरासरी 6 महीने लागतात. बहुतांश क्रिएटर्स तर याला कंटाळून चॅनेलवर काम करणेच बंद करतात. मात्र विकास दिव्यकीर्ती यांनी काही तासातच हा क्रायटेरिया (Monetization Criteria for YouTube) पूर्ण करण्याची कमाल करून दाखवली आहे. कोण आहेत विकास दिव्यकीर्ती आणि त्यांना हे सर्व कसे शक्य झाले, हे आपण जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
कोण आहेत विकास दिव्यकीर्ती? (Who is Vikas Divyakirti?)
डॉ. विकास दिव्यकीर्ती (Dr. Vikas Divyakirti) हे दृष्टी आयएएस या दिल्लीतील यूपीएससी कोचिंग संस्थेचे प्रमुख आहेत. तसेच ते माजी आयएएस अधिकारी देखील आहेत. 1998 पासून ते यूपीएससीच्या विद्यार्थ्याना शिकवण्याचे काम करत आहेत. यूपीएससी सीएसई व्यतिरिक्त अन्य स्पर्धा परीक्षेची तयारी करणारेही मोठ्या प्रमाणात त्यांचे व्हिडिओ बघत असतात. एखाद्या महत्वाच्या चालू घडामोडीवरील त्यांचे अभ्यासपूर्ण भाष्य आणि विषय समजावून सांगण्याची शैली यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये ते प्रसिद्ध आहेत. विद्यार्थ्यांव्यतिरिक्तही अन्य नागरिकही मोठ्या प्रमाणात त्यांचे व्हिडिओ बघत असतात.
संविधानदिनी केली चॅनेलला सुरुवात, 2 दिवसात 2 मिलियन Views
Dr Vikas Divyakirti यांनी संविधानदिनी म्हणजे 26 नोव्हेंबरला आपल्या यूट्यूब चॅनेलची सुरुवात केली. यानंतर काही तासातच यूट्यूब मॉनिटायझेशनच्या कितीतरी पट अधिक subscribers आणि वॉचटाइम या चॅनेलला मिळाला. सुमारे 13 मिनिटांचा हा व्हिडिओ, हे चॅनेल कशासाठी याविषयी भूमिका मांडणारा होता. फक्त 2 दिवसांत 6 लाख 50 हजारांपेक्षा जास्त subscribers आणि 2 मिलियनपेक्षा जास्त views त्यांना मिळाले.
विकास दिव्यकीर्ती यांना हे कसे शक्य झाले, हे पाहणे आवश्यक आहे. याचे कारण ते आता एक सेलीब्रिटीच झाले असले तरी रूढार्थाने ज्यांना सेलीब्रिटी म्हटले जाते, तसे ते नाहीत, किवा नव्हते असे आपण म्हणू शकतो. 2020 मधील कोरोना लॉकडाऊन काळात त्यांचे दृष्टी आयएएस या चॅनेलवरून व्हिडिओ अपलोड होऊ लागले. यानंतर त्यांची लोकप्रियता वाढत गेली.
काय असतो यूट्यूब चॅनेल मॉनिटायझेश क्रायटेरिया (Monetization Criteria for Youtube)
यूट्यूब मॉनिटाइज करण्याचे अनेक पर्याय असतात. पण सामान्यपणे जेव्हा याविषयी बोलले जाते तेव्हा त्याच्यामागे यू ट्यूब पार्टनर प्रोग्रामचा संबंध असतो. म्हणजे गुगल adsense द्वारे पैसे मिळवणे हा अर्थ असतो. अशाप्रकारे आपल्या यूट्यूब चॅनेलवरुन पैसे मिळण्यासाठी 1 हजार subscribers आणि 4 हजार तास वॉचटाईम हा बेसिक क्रायटेरिया असतो. यानंतर google adsense साथी अप्लाय करता येते.
इथे 2 -3 मुद्दे लक्षात घ्यायला हवेत. हे व्यूज google ads campaign मुळे नाहीत. कारण असे campaign सेट केल्यावर त्या गुगलकडून अप्रूव्ह व्हायला काही तास लागतात. त्यांतर प्रत्यक्ष जाहिरात रन व्हायला सुरुवात होण्यासाठी देखील वेळ जातो. मात्र या चॅनेलवर व्हिडिओ अपलोड होताच काही तासातच लाखो व्यूजचा टप्पा पार झाला होता. हा व्हिडिओ सरासरी 5 मिनिटे बघितला असेल तरी केवळ 50 हजार व्यूजमध्येच वॉचटाइमची आवश्यकता पूर्ण झाली होती. दूसरा मुद्दा केवळ शेअरिंगमुळे व्हिडिओ व्हायरल होतो असे नाही. उलट चुकीच्या शेअरिंगमुळे व्हिडिओ डेड होण्याची देखील शक्यता असते. तिसरा मुद्दा म्हणजे त्यांच्या दृष्टी आयएएस या चॅनेलमुळे हा व्हिडिओ व्हायरल झाला का, तर याचाही फारसा वाटा आहे, असे म्हणता येत नाही. कारण या चॅनेलचा subscribers बेस मोठा असला तरी त्यावरील प्रत्येक व्हिडिओला फार व्यूज मिळतात असे नाही. त्यांची तरुणांमध्ये वाढत असलेली क्रेझ हेच याचे मुख्य कारण असल्याचे दिसून येत आहे.
कसा होतो व्हिडीओ व्हायरल?
व्हिडिओ कसा व्हायरल होतो, हे समजून घेण्यासाठी यूट्यूबचे algorithm कसे काम करते ते समजून घ्यायला हवे. टायटल, description, लाईक, कमेंट, व्हिडिओची लोकप्रियता असे निकष सर्वसाधारपणे महत्त्वाचे ठरतात. सध्याच्या घडीला जेव्हा एखादा व्हिडिओ अपलोड होतो, तेव्हा तो व्हिडिओ व्हायरल होणार आहे की नाही हे त्याचा सीटीआर (Click Through Rate) आणि ऑडियन्स रिटेन्शन ठरवत असतात. आणि या दोन गोष्टी चांगल्या असणे हे कंटेन्टच्या गुणवत्ता आणि आकर्षकतेवर अवलंबून असते. यावरून दिव्यकीर्ती यांच्या वाढत जाणाऱ्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.