आपण ज्यावेळी आपल्या पहिल्या नोकरीची सुरुवात करतो, त्यावेळी पासूनच बचतीची सवय आपल्याला जडली पाहिजे. त्यावेळेस पासून केलेल्या योग्य गुंतवणुकीवर मिळालेलं चक्रवाढ व्याज आणि काढलेला विमा तुम्हाला भविष्यात उपयोगात पडू शकतो. म्हणून मिळालेल्या पगारात केवळ मौज-मज्जा न करता बचतीचा विचार करायला हवा.
Table of contents [Show]
वेळेवर गुंतवणूक करणे सुरु करा
जेवढ्या लवकर तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात कराल, तेवढ्या लवकर तुम्हाला मॅच्युरिटीचा लाभ उचलता येईल. एखाद्या ठिकाणी योग्य गुंतवणूक केल्यास, मिळणाऱ्या चक्रवाढ व्याजातून तुम्ही आयुष्यात एक-एक उद्दीष्ट पूर्ण करु शकता. योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास घर, गाडी, मुलांचे शिक्षण आणि इतर महत्वाचा खर्च तुम्ही कुठलाही ताण न घेता करु शकता.
विमा खरेदी करा
कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी आधी स्वतःचा विमा काढा. जीवन विमा आणि आरोग्य विमा हे दोन्ही प्रत्येकासाठी आवश्यक आहे. जीवन विमा हा आयुष्यात अकस्मात काही घडल्यास तुमच्या कुटूंबियांच्या उपयोगात येतो. तर, आरोग्य विम्यामुळे अचानक उद्भवलेल्या आजारपणात किंवा अपघातात तुमचे मेहनतीचे पैसे अचानक गमवावे लागत नाही.
आपत्कालीन निधी जमा ठेवा
आयुष्यात प्रत्येकाने आपला आपत्कालीन निधी तयार ठेवावा. प्रत्येकाने आपला 6 महिन्याचा खर्च आपत्कालीन निधी म्हणून ठेवावा. खाजगी नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबासाठी हा निधी नेहमी महत्वाचा ठरतो. अशा प्रकारचा निधी एफडी सारख्या योजनेत गुंतवणूक केल्यास, भविष्यात त्याचा चांगला लाभ होतो.
गुंतवणूक करताना वैविध्यता ठेवा
तुमचा पगार विविध ठिकाणी गुंतवणूक करा. विविध ठिकाणी गुंतवणूक केल्यास, भविष्यात त्याचा योग्य लाभ मिळतो. जसजश्या जबाबदाऱ्या वाढत जातात, तसतशी गुंतवणूक करणे, वाढवायला हवे. एफडी, लार्ज कॅप, फ्लेक्सी कॅप फंड यांचा गुंतवणूकीत समावेश करावा. गुंतवणूकीत इक्विटी-डेटचे योग्य संतुलन ठेवा.
दररोज 1 रुपयांनी गुंतवणूक वाढावा
लहानपणी आपण पिगी बँकमध्ये पैसे गोळा करायचो. तीच सवय आता देखील सुरु करा. दररोज 1 रुपयाची गुंतवणूक करा आणि ती प्रत्येक दिवसाच्या अनुषंगाने वाढवत जा. उदा. पहिल्या दिवशी 1 रुपया सेव्ह करा, दुसऱ्या दिवशी दोन, तिसऱ्या दिवशी तीन असे करत दिवसागणिक गुंतवणूक 1 रुपयाने गुंतवणूक वाढवत जा. 1 वर्ष तुम्ही काटकसरीने गुंतवणूक केली तर 365 दिवसानंतर तुमच्याकडे 66,795 रुपये साठतील.