Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment : कमी पैशात गुंतवणूक करायची आहे; तर 'हे' पर्याय बेस्ट ठरू शकतात

investment

Investment : आपल्याकडे पुरेसा निधी नसल्यामुळे गुंतवणूक करता येत नाही, असे आपण बऱ्याच जणांकडून ऐकतो. खरे तर, गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या निधीची गरज लागत नाही. उलट बचत करण्यावर भर देऊन नियमित गुंतवणूक सुरू करता येऊ शकते. अशाप्रकारे तुम्ही चांगला परतावा ही मिळवू शकता.

Investment : आपल्याकडे पुरेसा निधी नसल्यामुळे गुंतवणूक करता येत नाही, असे आपण बऱ्याच जणांकडून ऐकतो. वास्तविक गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या निधीची गरज नाही. उलट जास्तीत जास्त बचतीवर भर देऊन नियमित गुंतवणूक सुरू करता येऊ शकते. यासाठी उत्पन्न, खर्च आणि बचत यात समतोल राखता यायला पाहिजे, म्हणजे आर्थिक नियोजन सुरळीत राहते. कमी पैशात गुंतवणूक करण्यासाठी खालील 5 गोष्टी महत्त्वाच्या ठरू शकतात.

शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरू करावी 

गुंतवणूक सुरू करण्यासाठी वयाची मर्यादा नाही, परंतु तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल तितके चांगले. दीर्घ कालावधीत, अगदी छोटे योगदान देखील मोठ्या प्रमाणात बचत जोडू शकते. तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितके तुमचे भांडवल वाढेल आणि तुम्हाला जास्त परतावा मिळेल.  

सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स

इतर ठिकाणी गुंतवणूक करतांना तुमच्या आर्थिक स्थितीवर खूप ताण येतो. त्याऐवजी SIP मध्ये गुंतवणूक योजनेचा पर्याय निवडून त्यामध्ये गुंतवणूक करू शकता. सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIP) द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हा गुतवणूक सुरू करण्याचा उत्तम मार्ग आहे. 

या योजनांमध्ये कमीत कमी रक्कम गुंतवू शकता 

तुम्ही कोणत्याही बँकेत 1000 रुपयांपासून सुरुवात करू शकता. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड  किंवा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटसारख्या पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला करमुक्त परतावा मिळू शकतो आणि 100 रुपयापासून सुरुवात होऊ शकते. सार्वभौम गोल्ड बॉड्स किंवा आरबीआय बाँड्ससारख्या सरकारी रोख्यांमध्ये गुतवणूक केल्याने तुम्हाला निश्चित दराने परतावा मिळू शकतो आणि 5000 रुपयांपासून सुरुवात होऊ शकते. 

एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स

एक्स्चेंज ट्रेडेड फंड्सद्वारे ब्लू-चिप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे हा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याचा आणि 500पासून सुरुवात करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो. म्युच्युअल फंड किंवा ETF द्वारे आंतरराष्ट्रीय समभागामध्ये गुंतवणूक केल्याने तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यास आणि 5000पासून सुरुवात करण्यास मदत होऊ शकते.

पोस्ट ऑफिस आरडी 

पोस्ट आरडी 100 रुपयांपासून सुरू होते. 100 रुपये ते 5000 रुपयांपर्यंत तुम्ही त्यात दर महिन्याला गुंतवणूक करू शकता. उदा. आरडी कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडीमध्ये दर महिन्याला 1000 रुपये गुंतवले तर तुम्ही एका वर्षात एकूण 12,000 रुपये गुंतवाल आणि 5 वर्षांत तुम्ही 60,000 रुपये गुंतवाल. यामध्ये,  5 वर्षांमध्ये, तुम्हाला 5.8 नुसार एकूण 9,694 रुपये व्याज मिळतील आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 69,694 रुपये मिळतील.