Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment Options: निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी कुठे गुंतवणूक करावी? जाणून घ्या

Investment Options

Image Source : https://www.freepik.com/

निवृत्तीनंतरही नियमित उत्पन्न सुरू असल्यास निश्चितच फायदा होतो. मात्र, यासाठी नोकरी करत असतानाच गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी नोकरी करत असतानाच गुंतवणूक करणे गरजेचे आहे. निवृत्तीनंतर पगार बंद झाल्यावर हीच गुंतवणूक आपल्या उपयोगी येते. गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असले तरीही तुम्हाला कशातून नियमित उत्पन्न मिळू शकते, याचा विचार करणे गरजेचे आहे. 

सोने व स्टॉक्समध्ये केलेल्या गुंतवणुकीतून नियमित उत्पन्न मिळणार नाही. त्याऐवजी पेन्शन योजना, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहिन्याला पैसे मिळतील. या लेखातून अशाच गुंतवणुकीच्या काही पर्यायांविषयी जाणून घेऊयात, ज्यातून तुम्हाला निवृत्तीनंतरही नियमितपणे उत्पन्न मिळेल.

नियमित उत्पन्नासाठी गुंतवणूक गरजेची

निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नासाठी गुंतवणूक करणे का गरजेचे आहे, हे आधी समजून घ्यायला हवे. तुम्हाला पेन्शन मिळत असल्यास त्या रक्कमेतून दैनंदिन खर्च पूर्ण करू शकता. मात्र, पेन्शन मिळत नसल्यास समस्या निर्माण होऊ शकते. अशावेळी उत्पन्नाचे विविध मार्ग असल्यास निश्चितच फायदा होऊ शकतो. तुम्ही जेवढ्या कमी वयात गुंतवणूक सुरू कराल, तेवढा अधिक फायदा निवृत्तीनंतर होईल. 

नियमित उत्पन्नासाठी कुठे गुंतवणूक करावी?

मुदत ठेवी (FD)बँकेतील मुदत ठेवी हा गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय व सुरक्षित पर्याय आहे. मुदत ठेवीमध्ये नुकसान होत नाही व व्याजदर देखील जास्त असते. अनेक बँका मुदत ठेवीवर 5 ते 8 टक्क्यांपर्यंत व्याज देतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.25 ते 0.50 टक्के व्याजदर जास्त असतो. तसेच, मुदत ठेवीवर मासिक, त्रैमासिक व वार्षिक स्वरुपात व्याजाची रक्कम मिळते. त्यामुळे वृद्ध नागरिकांसाठी गुंतवणूक व नियमित उत्पन्नासाठी हा एक चांगला पर्याय आहे. 
पोस्ट ऑफिस बचत योजनामुदत ठेवीप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये पोस्ट ऑफिसची ही योजना लोकप्रिय आहे. या योजनेत 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते व मॅच्युरिटी कालावधी 5 वर्ष आहे. या ठेवीवर सध्या 7.4 टक्के व्याज मिळते. तसेच, ठेवीवरील व्याज हे दरमहिन्याला वितरित केले जाते.
पेन्शन योजनानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्न सुरू राहावे यासाठी पेन्शन योजनांमध्येही गुंतवणूक करू शकता. सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री वय वंदना योजना, अटल पेन्शन योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना राबवली जाते. याशिवाय, एलआयसी, एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ, बजाज अलियान्झ सारख्या कंपन्यांकडूनही पेन्शन योजना राबवल्या जातात. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास निवृत्तीनंतर दरमहिन्याला पैसे मिळतील. तुम्ही जेवढी जास्त गुंतवणूक कराल तेवढे अधिक पेन्शन मिळेल. 
म्युच्युअल फंड (सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन)निवृत्तीनंतर आर्थिक समस्या निर्माण होऊ नये व नियमित उत्पन्न सुरू राहावे यासाठी म्युच्युअल फंडच्या सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनची (SWP) निवड करू शकता. यामध्ये गुंतवणूकदार स्वतः जमा झालेली रक्कम कशाप्रकारे काढता येईल हे ठरवू शकतो. समजा, म्युच्युअल फंडमध्ये 5 लाख रुपये जमा झाले आहेत. अशावेळी तुम्ही दरमहिन्याला 10 हजार रुपये त्यातून नियमितपणे काढू शकता. तसेच, उर्वरित रक्कमेत बाजारानुसार बदल होईल. 
रिअल इस्टेट

जास्त गुंतवणूक करण्याची क्षमता असल्यास रिअल इस्टेटच्या माध्यमातूनही तुम्हाला नियमितपणे पैसे मिळू शकतात. तुम्ही फ्लॅट अथवा व्यावसायिक मालमत्ता खरेदी करून भाड्याने देऊ शकता. दरमहिन्याला या मालमत्तेतून भाडे मिळत राहील.