• 02 Oct, 2022 09:17

इन्कम टॅक्स रिटर्न न भरल्यास किती दंड लागतो?

ITR FORM  income tax

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Return Filing) भरण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत; 2021-22 या आर्थिक वर्षाचे रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2022 आहे.

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Return Filing) भरण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. ज्या करदात्यांना त्यांच्या खात्याचे ऑडिट करण्याची आवश्यकता नाही; त्यांच्यासाठी 2021-22 या आर्थिक वर्षाचे रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे.

तुम्ही पगारदार व्यक्ती, पेन्शनधारक किंवा गृहिणी आहात आणि तुम्हाला ऑफिसमधून फॉर्म-16 मिळाला असेल किंवा नसेल तरीही लवकरात लवकर तुम्हाला आयटीआर फाईल करावे लागणार आहे. कारण इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख (Last date for ITR Return) 31 जुलै निश्चित करण्यात आली आहे. या तारखेनंतर तुम्हाला ITR Return भरण्यासाठी दंड भरावा लागेल. इन्कम टॅक्स कायद्याच्या (Income Tax Act) कलम 234A आणि कलम 234F अंतर्गत भराव्या लागणाऱ्या टॅक्सवर व्याजदेखील भरावे लागेल.

वेळेत रिटर्न न भरल्यास किती दंड लागतो?

इन्कम टॅक्स विभागाने (Income Tax Department) नेमून दिलेल्या तारखेनंतर रिटर्न भरल्यास 5 हजार रूपयांचा दंड भरावा लागतो. यात ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखाहून कमी आहे; त्यांना 1 हजार रूपये दंड भरून इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) दाखल करता येऊ शकतो. तसेच आयटीआर दाखल करण्यास मुदतीपेक्षा अधिक विलंब झाल्यास इन्कम टॅक्स कायदा 1961 च्या कलम 234A अंतर्गत दर महिन्याला 1% व्याज आकारले जाते.

ITR रिटर्न का भरायला हवा?

एका आर्थिक वर्षात आपल्याला किती उत्पन्न मिळते आणि त्याचे विविध स्त्रोत कोणते आहेत. याची माहिती सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरणे आवश्यक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याने तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत तपासले जातात व तो तुमच्या उत्पन्नाचा एक कायदेशीर पुरावा ठरू शकतो. सरकारच्या विविध योजनांचा, तसेच होम लोन घेताना रिटर्न भरल्याचा लाभ घेता येतो.