Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR भरण्याचे (इन्कम टॅक्स रिटर्न फिलिंग) हे आहेत फायदे, जाणून घ्या होईल तुमचा फायदा!- ITR Filing

ITR भरण्याचे (इन्कम टॅक्स रिटर्न फिलिंग) हे आहेत फायदे, जाणून घ्या होईल तुमचा फायदा!- ITR Filing

आयटीआर भरण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. त्यामुळे विलंब न करता सर्वप्रथम हे काम मार्गी लावा. कारण, ते भरून तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

कामाच्या व्यस्ततेमुळे किंवा काही इतर कारणांमुळे तुम्ही अजून इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरलेला नसेल तर तो त्वरित भरून घ्या. आयटीआर भरणे अनेक बाबतीत फायदेशीर आहे, आणि आयटीआर भरला नसेल तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. तुम्ही घरच्या घरी अगदी आरामात ITR भरू शकता. त्यामुळे अजिबात विलंब न करता, आयकर विभागाच्या पोर्टलवर लॉग-इन करा आणि आयटीआर भरा. लक्षात ठेवा की, आयटीआर भरताना पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक खात्याचा पुरावा, गुंतवणुकीचा पुरावा आणि फॉर्म 16 किंवा फॉर्म 26AS यासारखी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा.

आयटीआर न भरल्याने दंड

जर तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे आणि तरीही तुम्ही रिटर्न भरले नाही, तर तुम्हाला यासाठी दंड भरावा लागू शकतो . याशिवाय तुम्हाला इतर समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. त्यामुळे 31 मार्चपर्यंत ITR भरणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

आयटीआर भरण्याचे हे चार फायदे आहेत

टॅक्स टाळण्यासाठी लोक नवनवीन मार्ग शोधत असतात. पण आज आम्ही तुम्हाला टॅक्स भरण्याचे फायदे सांगणार आहोत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे की, रिटर्न भरण्याचे अनेक फायदे आहेत. यापैकी आम्ही चार प्रमुख गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.

कर्ज सहज उपलब्ध होईल

कर्ज घेताना बँक किंवा कोणतीही वित्तीय संस्था प्रथम तुम्हाला तुमचे उत्पन्न विचारते. तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार तुम्हाला कर्ज दिले जाते. अशा स्थितीत तुम्ही दाखल केलेले आयकर विवरणपत्र उपयुक्त ठरू शकते. आयटीआर तुमच्या उत्पन्नाची पडताळणी करू शकते. अशा अनेक वित्तीय संस्था आहेत ज्या तुमच्या आयटीआर मध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे कर्ज देतात. त्यामुळे आयटीआर कर्ज घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

तुमच्या व्यावसायात वाढ होईल

तुमचा कोणताही व्यवसाय असल्यास, तुमच्यासाठी ITR खूप महत्त्वाचे आणि फायदेशीर आहे. कारण भारतात अशा अनेक सरकारी कंपन्या आहेत. ज्या बाजारातील कंपन्यांनी बनवलेला माल विकत घेतात. पण हा माल विकत घेताना सरकारी कंपन्या अशा कंपन्यांनी मागील 2 ते 3 वर्षांत आयटीआर रिटर्न भरले आहे का? हे तपासूनच त्यांच्याकडून माल विकत घेतात. अशाप्रकारे तुम्ही रिटर्न भरले असेल तर तुमच्या व्यवसायात वाढ होण्यासाठी याची मदत होऊ शकते.  

विमा संरक्षण मिळवण्यासाठी

कर्जाव्यतिरिक्त, जर तुम्हाला 1 कोटी रुपयांपर्यंतचा विमा संरक्षण घ्यायचा असेल तर आयटीआर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. अनेक विमा कंपन्या तुम्हाला विमा संरक्षण देताना आयटीआर मागतात. विमा कंपन्या तुमचे उत्पन्न आणि तुमची आर्थिक नियमितता तपासण्यासाठी आयटीआरचा वापर करतात. 

मालमत्ता खरेदी आणि विक्री करणे सोपे

आयटीआर भरल्याने तुम्हाला घराची खरेदी-विक्री, बँकांमध्ये मोठी रक्कम जमा करण्यास आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास मदत होते. कारण अशा गोष्टींसाठी बॅंका आणि म्युच्युअल फंड कंपन्या तुमची आर्थिक पत तपासण्यासाठी आयटीआर पाहतात. तुम्हाला म्युच्युअल फंडात मोठी रक्कम गुंतवायची असेल, तर आयकर विभागाकडून नोटीस येण्याचा धोका कमी होतो.