सध्या Crypto Market गती मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. Bitcoin (BTC) आणि Ethereum (ETH) या दोन सर्वात लोकप्रिय क्रिप्टो नाण्यांनी किरकोळ वाढ नोंदवली आहे. तर इतर महत्त्वाचे असलेले Dogecoin (DOGE), Ripple (XRP), Litecoin (LTC) आणि Solana (SOL) आदी नाण्यांमध्ये मिश्र वाढ आणि घट गेल्या चोवीस तासांमध्ये दिसून आली आहे. XDC नेटवर्कने गेल्या चोवीस तासांत सर्वांधिक 5 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. आज 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप 809.93 अब्ज होते, चोवीस तासांत 0.61 टक्क्यांनी घसरण झाल्याचे नोंदवले आहे.
आजच्या क्रिप्टोकरन्सींच्या किंमती Cryptocurrency Prices Today:
- Bitcoin (BTC): CoinMarketCap नुसार, बिटकॉइनची किंमत 0.46 टक्क्यांनी मागील चोवीस तासांत वाढून 16,813.62 युएस डॉलर झाली आहे. Indian exchange WazirX नुसार, बीटीसीची किंमत 14.55 लाख रुपये होती.
- Ethereum (ETH): ETH किंमत 1,208.59 युएस डॉलरवर होती, 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजाता मागील चोवीस तासांत 1.27 टक्के वाढ झाल्याचे दर्शवले होते. WazirX नुसार, भारतात Ethereum किंमत रु. 1.04 लाख होती.
- Dogecoin (DOGE): DOGE ने CoinMarketCap डेटानुसार मागील चोवीस तासांत 2.01 टक्के नुकसान नोंदवले आहे, ज्याची सध्या किंमत 0.07269 युएस डॉलर एवढी आहे. WazirX नुसार, भारतातील Dogecoin ची किंमत 6.50 रुपये होती.
- Litecoin (LTC): Litecoin मध्ये मागील चोवीस तासांत 0.37 टक्के वाढ दिसून आली आहे. हे कॉईन सकाळी 10 वाजता 65.08 युएस डॉलरवर व्यापार करत होते. भारतात LTC ची किंमत 5,602.01 रुपये होती.
- Ripple (XRP): XRP ची किंमत 0.3399 युएस डॉलरवर सकाळी 10 वाजता होती, तर चोवीस तासांत 0.24 टक्के घट आढळून आली आहे. WazirX नुसार Ripple (XRP) किंमत 29.15 रुपये होती.
- Solana (SOL): Solana ची किंमत 12.05 युएस डॉलर एवढी होती. यात चोवीस तासांमध्ये 1.66 टक्क्यांचा तोटा झालेला आहे.
WazirX नुसार, भारतात SOL ची किंमत रु. 1,099 होती.