Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पुन्हा Bitcoin मध्ये घसरण! Cryptocurrency का सातत्याने घसरत आहे?

Cryptocurrency Falling Consistently

Cryptocurrency : सध्या क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency) घसरण सुरु आहे. आज बिटकॉईनच्या दरात 5 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. क्रिप्टोला उतरती कळा लागण्याची नेमकी कारणे काय आहेत, ते या लेखातून समजून घेऊयात.

सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बिटकॉईन (Bitcoin) मागील चार आठवड्यांपासून खालावत आहेत. आज, 20 डिसेंबर रोजी 5 टक्क्यांनी घसरली असून 16 हजार 805 युएस डॉलर्सवर आली आहे. बीटकॉईनसह इतर सर्व क्रिप्टोकरन्सीमध्ये गेल्या चार आठवड्यांपासून सातत्याने घसरण नोंदवण्यात येत आहे. क्रिप्टोकरन्सींनी गेल्या वर्षीच्या अखेरीस विक्रमी उच्चांक गाठला होता, मात्र त्यानंतर 2022 मध्ये दिवसागणिक मोठी घसरण पाहायला मिळात आहे.

क्रिप्टोकरन्सींमध्ये घसरण होण्याची कारणे (Reasons for Decline in Cryptocurrencies) - 

सातत्याने S&P 500 मध्ये घसरण होत असल्यामुळे क्रिप्टोवर याचा परिणाम होत असून क्रिप्टोचीही घसरण होत आहे. S&P 500 म्हणजे Standard and Poor's 500 - स्टॉक मार्केट इंडेक्स युनायटेड स्टेट्समधील स्टॉक एक्सचेंजच्या लिस्टमध्ये असलेल्या 500 मोठ्या कंपन्यांच्या स्टाॉक कामगिरीला ट्रॅक करतात. घसरल्यामुळे होत आहे. जर  S&P 500 मार्केट स्थिरावले, तर क्रिप्टोची घसरण थांबून, वाढीला वाव मिळेल, असे मुद्रेक्स क्रिप्टोचे सीईओ आणि को-फाऊंडर एड्युल पटेल यांनी लाईव्ह मिंटला माहिती दिली.

FTX Trading Ltd. ही उत्तर अमेरिकेतील 2019 मध्ये सुरू झालेली कंपनी, क्रिप्टो एक्सचेंज व्यवहार, फंड आदी गोष्टी हाताळत होती. मात्र, जुलै 2021 मध्ये बँकरप्ट झाली. तर नोव्हेंबर 2022 पासून ब्लॉकफाय (BlockFi) ही क्रिप्टो कंपनी बँकरप्ट झाली. यामुळे 4.8 बिलियन युएस डॉलरचे नुकसान झाले. ज्याचा परिणाम आता एकूणच क्रिप्टोकरन्सींवर होत आहे. आता नोव्हेंबरपासून जी घसरण होत आहे, त्यामागे क्रिप्टोकरन्सीच्या एक्सेंजमध्ये विविध अडथळे आले आहेत. ज्याचा परिणाम म्हणजे गुंतवणुकदार क्रिप्टोकरन्सी विकत आहेत आणि अन्य गुंतवणूक पर्यायांकडे वळत आहेत, असे शेअर मार्केट सल्लागार अमित देशमुख यांनी महामनीला सांगितले.

सध्या बाजारात मंदीसदृश्य परिस्थिती तयार झालेली आहे, व्यापारही मंद गतीने सुरु आहेत, चलनाच्या किंमतींमध्ये वाढ होत आहे, व्याजदर वाढत आहेत एकूणच बाजारात आर्थिक अनिश्चितता वाढली असल्यामुळे गुंतवणुकदारांचा त्यांचे अॅसेट अधिकाधिक विकण्याकडे कल दिसून येत आहे, हेदेखील क्रिप्टो खालावण्याचे कारण असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

आज क्रिप्टोकरन्सीमधील मोठ्या Bitcoin आणि Ether या करन्सी खालावत असल्या तरी काही  Litecoin, Chainlink, ApeCoin, Tron सारख्या लहान करन्सींमध्ये काही अंशांनी वाढ होत आहे, जी आज नगण्य दिसत असली तरी हे चित्र आशादायक आहे. बाजार स्थिरावला की क्रिप्टो मार्केटमध्येही सकारात्मर चित्र दिसून येईल, अशी आशा देशमुख यांनी दिली आहे.