Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vande Bharat Train : जानेवारी महिन्यात सुरू होणार 'ही' वंदे भारत ट्रेन

Vande Bharat

Image Source : www.siasat.com

Vande Bharat Vijayawada : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिकंदराबाद ते विजयवाडा दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन होणार आहे. या ट्रेनचं टाईम टेबल आणि मूळात वंदे भारत ट्रेन काय आहेत जाणून घेऊया.

नवीन वर्षी देशाला आणखी एक वंदे भारत (Vande Bharat) ट्रेन मिळणार आहे. सिकंदराबाद ते विजयवाडा (Secundarabad to Vijaywada) दरम्यान धावणाऱ्या या ट्रेनचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. अलीकडेच 30 डिसेंबरला मोदी यांनी देशातल्या सातव्या वंदे भारत ट्रेनचं (Vande Bharat) उद्घाटन पश्चिम बंगालमध्ये केलं होतं. आता सिकंदराबाद - विजयवाडा ट्रेन सुरू झाली की, दक्षिण भारतातली ही दुसरी वंदे भारत ट्रेन सेवा असेल. यापूर्वी चेन्नई ते म्हैसूर (Chennai to Mysore) दरम्यान पहिली सेवा सुरू झालेली आहे.     

नवीन वंदे भारत सेवेचं वैशिष्ट्यं म्हणजे यासाठी वापरले जाणारे कोच रेल्वेच्या चेन्नई कारखान्यात तयार झालेले असतील.     

 वंदे भारत ट्रेनची वैशिष्ट्ये Features of Vande Bharat     

वंदे भारत ट्रेन सेवा ही भारतीय रेल्वेकडून चालवण्यात येणारी सेमी-स्पीड रेल्वे सेवा आहे. या रेल्वे सेवांचा वेग 85 ते 150 किलोमीटर प्रती तास इतका असतो. तीन वर्षांपूर्वी फेब्रुवारी 2019 मध्ये पहिली वंदे मातरम् एक्सप्रेस सुरू करण्यात आली होती. या सेवेत एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर अशा दोन प्रकारच्या आसन व्यवस्था आहेत. आणि विमानातल्या खुर्चींप्रमाणे या खुर्च्याही खाली-वर करता येतात. तसंच प्रवासाच्या दिशेप्रमाणे त्या वळवताही येतात.     

या सेवे दरम्यान प्रवाशांना ऑनबोर्ड खाणं-पिणं ऑर्डर करता येतं. तसंच वाय-फाय आणि इतर मनोरंजनाचीही सोय आहे. वंदे भारत ट्रेनचं किमान भाडं 1,805 रुपये तर कमाल भाडं 3,884 इतकं आहे. या या गाडीसाठी आरक्षण तत्कालमध्येही करता येतं.     

सध्या सुरू असलेल्या वंदे भारत रेल्वे सेवा,     

नवी दिल्ली ते वाराणसी    

नवी दिल्ली ते वैष्णोदेवी कटरा     

नवी दिल्ली ते चंदिगड    

मुंबई - अहमदाबाद - गांधीनगर     

चेन्नई - बंगळुरू - मैसूर     

हावरा ते न्यू जलपायगुरी     

सिकंदराबाद ते विजयवाडा