टाटा ग्रुप (Tata group) आपले दोन आयपीओ आणण्याच्या प्रक्रियेत अग्रेसर झालेत. टाटा प्ले (Tata play) म्हणजेच पूर्वीचं टाटा स्काय (Tata sky) आणि ड्रोन निर्माता आयडियाज फोर्ज टेक्नॉलॉजी (IdeaForge Technology) यांचे आयपीओ बाजारात येणार आहेत. आयपीओद्वारे (Initial public offerings) निधी उभारण्यासाठी सेबीनं नुकतीच मंजुरी दिलीय. या निमित्तानं 18 वर्षांनंतर टाटा ग्रुपच्या कंपन्या शेअर बाजारात लिस्ट होण्यासाठी येत आहेत. सध्यातरी टाटा प्लेच्या प्रस्तावित आयपीओला सेबीकडून मंजुरी मिळालीय. टाटा ग्रुपतर्फे आपल्या आयपीओसाठी बाजार नियामक सेबीकडे (Securities and Exchange Board of India) गोपनीय कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत. असे करणारी टाटा ग्रुप ही पहिलीच कंपनी आहे. बिझनेस स्टँडर्डनं ही बातमी दिलीय.
Table of contents [Show]
टाटा प्लेचा दोन दशकांतच आयपीओ
सेबीकडे टाटा ग्रुपनं जी कागदपत्रे दाखल केली होती, त्यावर सेबीनं 26 एप्रिललाच एक ऑब्झर्वेशन लेटर जारी केलं होतं. दोन दशकांत आयपीओ आणणारी टाटा प्ले ही ग्रुपची पहिलीच कंपनी ठरू शकते. तर आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजीनंदेखील फेब्रुवारीमध्येच सेबीकडे आपली आवश्यक ती प्राथमिक कागदपत्रे दाखल केली होती. त्यांना 13 एप्रिलला सेबीचं ऑब्झर्वेशन लेटर मिळालं. प्री-फायलिंगच्या या प्रक्रियेत खरं तर कंपनीवर आयपीओसाठी कोणताही दबाव नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. सर्वसाधारणपणे पारंपरिक मार्गांचा विचार केला तर सेबीच्या मंजुरीनंतर किंवा फायनल ऑब्झर्वेशन लेटर नंतर 12 महिन्यांच्या आत आयपीओ लॉन्च करावा लागतो.
Tata Play's confidentially filed #IPO gets market regulator #Sebi go-ahead@This_khushboo reports https://t.co/zS52OoriCR#TataPlay pic.twitter.com/UDdTvtbNKf
— Business Standard (@bsindia) May 2, 2023
18 महिन्यांच्या आत आणला जाऊ शकतो आयपीओ
प्री-फायलिंगच्या प्रक्रियेदरम्यान सेबीच्या अंतिम मंजुरीच्या तारखेपासून 18 महिन्यांच्या आत आयपीओ आणला जाऊ शकतो. या मार्गाद्वारे अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (UDRHP) स्टेजपर्यंत प्रायमरी इश्यू साइज 50 टक्क्यांनी बदलण्याची लवचिकता मिळते. सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजीच्या पब्लिक इश्यूमध्ये 300 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा नवा इश्यू आणि प्रवर्तक तसंच आताच्या भागधारकांपैकी एकानं 48,69,712 इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट केलीय. ऑफर फॉर सेलमध्ये शेअर्स विकणाऱ्यांमध्ये आशिष भट, ए अँड ई इन्व्हेस्टमेंट एलएलसी (A&E Investment LLC), अग्रवाल ट्रेडमार्ट, सेलेस्टा कॅपिटल II मॉरिशस, सेलेस्टा कॅपिटल II-B मॉरिशस, एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया, इंडसेज टेक्नॉलॉजी व्हेंचर फंड I, क्वालकॉम एशिया पॅसेफिक प्रायव्हेट लिमिटेड (Qualcomm Asia Pacific Pte Ltd) आणि सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड इंटरप्रिन्योरशिप यांचा समावेश आहे.
A Good News For IPO Market:
— R.K. (@ipo_mantra) May 1, 2023
After 19 years, a Tata Group IPO is going to open soon.
Tata Technologies already filed IPO papers in March. This IPO will be 100% OFS for 9.57 Cr Shares.
There will be No Shareholder Quota.
GMP has already started today !
How is the mood ?
2007मध्ये कंपनीची स्थापना
कंपनीची स्थापना 2007मध्ये मुंबईत झाली होती. कंपनीकडे संपूर्ण भारतात स्वदेशी मानवरहित एरियल व्हेइकल्सची (UAVs) सर्वात मोठी ऑपरेशनल सिस्टम आहे. पाळत ठेवण्यासाठी तसंच मॅपिंग करण्यासाठी त्यांचे ड्रोन सरासरी दर पाच मिनिटांनी उड्डाण करत असतात.
टाटा सन्स आणि वॉल्ट डिस्ने यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या टाटा प्ले कंपनी आयपीओद्वारे सुमारे 3,000 कोटी उभारण्याचा विचार करत आहे. नव्या आणि जुन्या शेअर विक्रीची सरमिसळ यात असणार आहे. तर टाटा मोटर्सची उपकंपनी असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीनही मार्चमध्ये रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा मसुदा दाखल केला. लवकरच कंपनीला रेग्यूलेटरकडून मंजुरी मिळणार आहे. टाटा टेक्नॉलॉजीज आयपीओला सुमारे 4,000 कोटी रुपये अपेक्षित आहे.