शेअर मार्केटमध्ये सध्या नकारात्मकतेचे वातावरण असले तरी प्राथमिक बाजारातून भांडवल उभारणीसाठी अनेक कंपन्या इच्छुक आहेत. येत्या दिवाळीच्या मुहुर्तावर सहा कंपन्यांचे पब्लिक इश्यू शेअर मार्केटमध्ये धडकणार आहेत. यात बहुचर्चित टाटा समूहातील टाटा टेक्नॉलॉजीसच्या आयपीओचा समावेश आहे.
नोव्हेंबरमधील पहिल्या दोन आठवड्यात सहा कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. त्यात सेलो वर्ल्ड मामाअर्थची सहयोगी कंपनी असलेल्या होनासा कन्झ्युमर आणि मामाअर्थची सहयोगी कंपनी असलेल्या होनासा कन्झ्युमर या दोन कंपन्यांचे आयपीओ अनुक्रमे 30 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत.
फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रीज, ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक, प्रोटेन ईगव्ह टेक्नॉलॉजी आणि एएसके ऑटोमोटीव्ह या कंपन्यांचे आयपीओचे नियोजन अंतिम टप्प्यात आले. टाटा समूहातील टाटा टेक्नॉलॉजीस या कंपनीचा आयपीओ दिवाळी किंवा त्यानंतर लगेचच शेअर मार्केटमध्ये धडकण्याची शक्यता आहे.
मुख्य बाजाराप्रमाणेच एसएमई श्रेणीत देखील छोट्या कंपन्या भांडवल उभारणीसाठी आयपीओ आणणार आहेत. शंथाला एफएमसीजी प्रोडक्ट्स या कंपनीचा आयपीओ 27 ऑक्टोबर 2023 पासून खुला होणार आहे. कंपनीने प्रती शेअर 91 रुपयांचा किंमत पट्टा निश्चित केला असून कंपनी आयपीओतून 16.07 कोटी उभारणार आहे.
दुसरी एसएमई कंपनी मैत्रेय मेडिकेअरचा 14 कोटींचा आयपीओ 27 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या काळात गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. यासाठी प्रती शेअर 78 ते 82 रुपयांचा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे.
याशिवाय फेडबँक फायनान्शिअल सर्व्हिसेस, जना स्मॉल फायनान्स बँक, फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक आणि डीओएमएस इंडस्ट्रीज, वेस्टर्न कॅरिअर्स आणि दि पार्क हॉटेल्स या कंपन्यांचे आयपीओ प्रस्तावित आहेत.