Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IPO Investment: गुंतवणूकदारांना या आठवड्यात 4 आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी!

Investment in IPO

IPO Investment: शारदीय नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेनंतर सोमवारपासून या आठवड्यात गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी मिळणार आहे. या आठवड्यात जवळपास 4 आयपीओ गुंतवणुकीसाठी ओपन होणार आहेत; यातील 3 आयपीओ हे एसएमई आयपीओ आहेत.

IPO Investment: शारदीय नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेनंतर सोमवारपासून या आठवड्यात गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी मिळणार आहे. या आठवड्यात जवळपास 4 आयपीओ गुंतवणुकीसाठी ओपन होणार आहेत; यातील 3 आयपीओ हे एसएमई आयपीओ आहेत.

आयआरएम एनर्जी (IRM Energy)

गुजरातमधील गॅस वितरण करणारी कंपनी IRM Energy कंपनी 545 कोटी रुपयांचा आयपीओ आणत आहे. हा आयपीओ 18 ऑक्टोबरला ओपन होणार असून तो 20 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. आयआरएम एनर्जी  कंपनीने प्रति शेअर्सची किंमत 480 ते 505 रुपये अशी निश्चित केली आहे. याचे सर्व शेअर नवीन असणार असून कंपनी 1.08 कोटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे.

वुमनकार्ट (WomenCart)

वुमनकार्ट हा एसएमई कॅटेगरीमधील आयपीओ आहे. वुमनकार्ट ही ऑनलाईन रिटेलर कंपनी आहे. हिचा 16 ते 18 ऑक्टोबर यादरम्यान आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 9.56 कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओसाठी कंपनीने प्रति शेअरची किंमत 86 रुपये निश्चित केली आहे. या प्रत्येक शेअर्सची फेस व्हॅल्यू 10 रुपये असून, कंपनी 11.16 लाख नवीन शेअर्सची विक्री करणार आहे.

राजगोर कास्टर डेरिवेटीव्हज (Rajgor Caster Derivatives)

राजगोर कास्टर डेरिवेटीव्हज कंपनी 48 कोटी रुपयांचा आयपीओ आणत आहे. कंपनीने प्रति शेअरची किंमत 47-50 रुपये निश्चित केली. 17 ऑक्टोबरपासून हा आयपीओ गुंतवणुकीसाठी ओपन होणार नसून तो 20 ऑक्टोबरपर्यंत खुला असणार आहे. राजगोर कास्टर ही अहमदाबादमधील कंपनी आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून 88.95 लाख नवीन शेअर्सची विक्री करणार आहे. तर 6.66 लाख शेअर्सची ऑफर फॉर सेलमधून विक्री केली जाणार आहे.

अरविंद अ‍ॅण्ड शिपिंग कंपनी (Arvind & Shipping Company)

अरविंद अ‍ॅण्ड शिपिंग कंपनीचा आयपीओ 12 ऑक्टोबरला ओपन झाला असून तो आज बंद होणार आहे. आतापर्यंत हा आयपीओ 41.33 पट सब्स्क्राईब झाला आहे. या कंपनीचे मुख्यालय गुजरातमध्ये असून ही कंपनी समुद्रातील जहाजे आणि त्याच्याशी संबंधित सेवा पुरवते. हा सुद्धा एसएमई आयपीओ असून त्याची किंमत 14.74 कोटी आहे.