Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cello World IPO: सेलो वर्ल्ड आयपीओ आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; 648 रुपये प्रति शेअरची किंमत

Cello World IPO

Image Source : www.vxpress.in

Cello World IPO: सेलो वर्ल्ड लिमिटेड कंपनी होम आणि किचन अप्लायन्सेससाठी प्रसिद्ध आहे. या व्यतिरिक्त कंपनी स्टेशनरी वस्तुंची सुद्धा निर्मिती करते. कंपनीने 1900 कोटी रुपयांचा आयपीओ आणला आहे.

Cello World IPO: टिफिन बॉक्स आणि थर्माससाठी प्रसिद्ध असेल्या सेलो कंपनीचा आयपीओ आजपासून (दि. 30 ऑक्टोबर) गुंतवणुकीसाठी खुला झाला असून 1 नोव्हेंबरपर्यंत ओपन असणार आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून जवळपास 1900 कोटी रुपये उभारणार आहे. पण कंपनीने या आयपीओच्या माध्यमातून एकही नवीन शेअर विक्रीसाठी उपलब्ध करून देत नाही. सर्व शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत असणार आहेत. त्यामुळे या आयपीओतून कंपनीला थेट फायदा होणार नाही.

सेलो कंपनीने अँकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 567 कोटी रुपये जमा केले आहेत. मॉर्गन स्टॅनले आशिया (सिंगापूर), बीएनपी पारिबास आर्बिट्रेज, सीएलएसए ग्लोबल मार्केट्स, बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स, आयसीआयसीआय प्रुडेन्टिशिअल म्युच्युअल फंड, एड्लवाईज म्युच्युअल फंड आणि एचडीएफसी म्युच्युअल फंडसह एकूण 39 अँकर गुंतवणूकदारांना 648 रुपये प्रति शेअरने 87.49 लाख शेअर्स विकले आहेत.

सेलो वर्ल्ड लिमिटेड कंपनी होम आणि किचन अप्लायन्सेससाठी प्रसिद्ध आहे. या व्यतिरिक्त कंपनी स्टेशनरी वस्तुंची सुद्धा निर्मिती करते. कंपनीने आपल्या शेअरची फेस व्हॅल्यू प्रति शेअर 5 रुपये किंमत ठेवली आहे. गुंतवणूकदारांना आजपासून 1 नोव्हेंबरपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. कंपनीने 2.93 कोटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्याची किंमत 1900 कोटी रुपये आहे. या शेअर्सची किंमत कंपनीने 617 ते 648 रुपये अशी निश्चित केली. आयपीओच्या एका लॉटमध्ये एकूण 23 शेअर्स असणार आहेत. गुंतवणूकदारांना याच्या एका लॉटसाठी किमान 15 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या शेअर्सच्या खरेदीमध्ये प्रत्येक शेअरमागे 61 रुपयांची सवलत मिळणार आहे.

1 नोव्हेंबरला आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची मुदत संपल्यानंतर 6 नोव्हेंबरला आयपीओचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर ज्या गुंतवणूकदारांना आयपीओ लॉट लागला नाही. त्यांचे पैसे 7 नोव्हेंबरला परत केले जातील. तर 8 नोव्हेंबरला शेअर्सचे डीमॅट खात्यात वाटप आणि 9  नोव्हेंबरला त्याचे मार्केटमध्ये लिस्टिंग होईल. सध्या ग्रे मार्केटमध्ये सेलोच्या शेअर्सला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अप्पल प्राईस बॅण्डनुसार प्रत्येक शेअरमागे 120 रुपयांची वाढ दिसून येत आहे.

सेलो कंपनीचे देशभरात विविध ठिकाणी 13 प्रकल्प कार्यरत आहेत. तसेच कंपनी राजस्थानमध्ये लवकरच ग्लास निर्मितीचा कारखाना उभारणार आहे. 2021 मध्ये कंपनीला 165.55 कोटी तर 2022 मध्ये 219.52 कोटी रुपयांचा नफा झाला होता. सध्याच्या आर्थिक वर्षात कंपनीला आतापर्यंत 82.83 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.