Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Twitter Blue Tick : आयफोन धारकांकडून ब्लू टिकसाठी ट्विटर घेणार अतिरिक्त पैसे?   

ब्लू ट्विटर

Image Source : www.twitter.com

तुम्ही तुमच्या आयफोनवर ट्विटर वापरणार असाल तर ब्लू टिकसाठी तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागू शकतात. ट्विटरने आयफोनच्या एका धोरणाचा निषेध म्हणून तसा निर्णय घ्यायचं ठरवलं आहे. त्यामुळे ट्विटर वेब पेजवर वापरणं कदाचित जास्त स्वस्त पडू शकेल

सोशल मीडिया कंपनी ट्विटरने (Twitter)आयफोनवर (IPhone) ट्विटर वापरणाऱ्यांकडून ब्लू टिकसाठी (Twitter Blue Tick) दर महिन्याला 11 अमेरिकन डॉलर (सुमारे 900 रुपये) इतकी फी वसूल करण्याचं ठरवलं आहे. टेक जायंट आयफोन कंपनी फोनवरून पेमेंट्स करण्यावर 30% कर आकारते. याला निषेध म्हणून ट्विटरने हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. अशा आशयाची बातमी अमेरिकन बेवसाईट ‘द इन्फॉर्मेशनने’ दिली आहे.     

ट्विटर वेबवरून वापरायला प्रोत्साहन Use Twitter on Web    

वेबसाईटवरून ट्विटर वापरत असाल तर तुम्हाला महिन्याला 7 अमेरिकन डॉलर (सुमारे 575 रु) मोजावे लागतील. लोकांनी मोबाईल फोन ऐवजी वेबसाईटवरून ट्विटर वापरावं यासाठी प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न असल्याचं द इन्फॉर्मेशनमध्ये म्हटलं आहे. अँड्रॉईड प्रणाली वापरणाऱ्यांसाठी या दरांमध्ये काही बदल असेल का हे मात्र ट्विटरने अजून स्पष्ट केलेलं नाही.     

ट्विटरचा ताबा टेस्लाचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांच्याकडे गेल्यावर त्यांनी ब्लू टिक आधी बंद केली. आणि नंतर हे फिचर हवं असेल तर पैसे मोजावे लागतील असं धोरण स्पष्ट केलं. निश्चित धोरण ठरेपर्यंत ब्लू टिक फिचर सध्या ट्विटरकडून बंद करण्यात आलंय.     

‘ट्विटर ब्लू’ कधी सुरू होणार? Twitter Blue Relaunch     

11 नोव्हेंबरपासून ट्विटरचं ब्लू फिचर बंद आहे. आणि ते पुन्हा सुरू करण्याची तारीख कंपनीने वेळोवेळी पुढे ढकलली आहे. कारण, सध्या ते कसं सुरू करायचं आणि नेमके किती पैसे आकारायचे यावर कंपनीकडे निश्चित धोरण नाही. एलॉन मस्क यांनी स्वत: यापूर्वी 2 डिसेंबर ही तारीख दिली होती. आणि या महिन्यात ब्लू ट्विटर पुन्हा सुरू होईल असा अंदाज आहे.     

मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यांनंतर ट्विटरने ब्लू टिकसाठी एक चेकमार्क (Checkmark) बसवला. त्यामुळे सामान्य व्यक्तीलाही सेलिब्रिटी तसंच हाय-प्रोफाईल व्यक्तींसारखी वागणूक ट्विटरमध्ये मिळू लागली. म्हणजे त्यांचं ट्विटर अकाऊंट हाय-प्रोफाईल झालं.     

भारतात ब्लू ट्विटरसाठी किती पैसे? Cost of Blue Twitter in India     

अमेरिका, कॅनडा तसंच ऑस्ट्रेलियात ब्लू ट्विटरसाठी 7.99 अमेरिकन डॉलर दर महिन्याला भरावे लागतील. भारतात या सेवेसाठी साधारण 719 रुपये पडतील. भारतात आयफोनवर ट्विटर वापरणाऱ्यांना नेमके किती पैसे भरावे लागतील याची स्पष्टता मात्र अजून आलेली नाही. ट्विटर ब्लू सेवा घेणाऱ्यांना आता मिळते तशा ब्लू टिकसारखा एक चेकमार्क मिळेल. शिवाय तुमच्या ट्विटना मिळणारा प्रतिसाद, प्रतिक्रिया तसंच त्यांना मिळणारा सर्च आणि मेन्शन्स (Search, Mention Tweets) यांना चांगला रिचही मिळेल. म्हणजे ते जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचतील. ट्विटर ब्लू ग्राहकांना मोठ्या मुदतीचा व्हीडिओ आणि ऑडिओही पाहता येईल असंही बोललं जातंय.