• 28 Nov, 2022 16:56

Elon Musk's Net Worth Fall: टेस्लाचे शेअर कोसळले, इलॉन मस्क यांच्या संपत्तीत घसरण

Elon Musk's net worth Fall, Elon Musk, Tesla Share Price, Twitter

Elon Musk's Net Worth Fall: आपल्या बेधडक निर्णयांनी गेल्या आठवड्यापासून चर्चेत आलेले टेस्लाचे बॉस इलॉन मस्क यांच्या संपत्तीत घसरण झाली आहे. इलॉन मस्क यांची एकूण संपत्तीचा आकडा 200 बिलियन डॉलरखाली आला. मात्र असे असूनही इलॉन मस्कच जगातील सर्वाधिक नेटवर्थ असणारे उद्योजक आहेत.

फोर्ब्स या मासिकाने जाहीर केलेल्या ताज्या अहवालानुसार टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांच्या संपत्तीत मागील दोन दिवसात मोठी घसरण झाली आहे. एलन मस्क यांची एकूण संपत्ती 200 बिलियन डॉलर्सच्या खाली घसरली आहे.टेस्लाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याने इलॉन मस्क यांना फटका बसला आहे. केवळ गुंतवणूकदारच नाही तर खुद्द मस्क यांनीही टेस्लाचे लाखो शेअर्स विक्री केले.

अमेरिकी शेअर मार्केटमध्ये मंगळवारी टेस्लाच्या शेअरमध्ये (Tesla Inc. Share Fall) मोठी घसरण झाली होती. इलॉन मस्क यांची ट्विटर व्यवस्थापनातील आक्रमक भूमिकेने गुंतवणूकादार घाबरले आहेत. त्याचा परिणाम टेस्लाच्या शेअरवर दिसून आला.

इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती 194.8 बिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे. काही महिन्यांपूर्वी मस्क यांच्या एकूण संपत्तीचा आकडा 200 बिलियन डॉलर्सवर गेला होता. मात्र टेस्लाच्या शेअरमधील घसरणीने मस्क यांच्या संपत्तीवर परिणाम झाला. इलॉन मस्क यांनी सध्या ट्विटरवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे टेस्ला कंपनीकडे दुर्लक्ष झाल्याची भावना गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली आहे.  

इलॉन मस्क यांच्या तडकाफडकी निर्णयांचा गुंतवणूकदारांनी घेतला धसका

ट्विटरच्या खरेदीसाठी बोली लावल्यापासून टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांच्या तडकाफडकी घेतल्या जाणाऱ्या निर्णयांचा गुंतवणूकदारांनी धसका घेतला होता. गेल्याच महिन्यात मस्क यांनी ट्विटरला खरेदी करण्याचा करार पूर्ण केला होता. मस्क यांनी ट्विटरसाठी 44 बिलियन डॉलर खर्च केले. यात 33.5 बिलियन डॉलर्सची इक्विटी आणि 13 बिलियन डॉलर्सचे कर्ज अशा स्वरुपात हा व्यवहार झाला होता. ट्विटर ताब्यात घेताच मस्क यांनी कंपनीच्या खर्च कपातीला प्राधान्य दिले आहे. मस्क यांनी ट्विटरमधील सीईओंपासून वरिष्ठ व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांना कामावरुन काढून टाकले. यामुळे टेस्लाचे गुंतवणूकदार धास्तावले आहेत.

tesla-shares.png

टेस्लाच्या शेअरमध्ये झाली प्रचंड घसरण (Tesla Inc. Share)

सोशल मिडियातील आघाडीची कंपनी ट्विटरसाठी बोली लावल्यानंतर टेस्लाच्या शेअरमध्ये घसरण झाली. एप्रिलपासून टेस्लाने जवळपास 70 बिलियन डॉलर्स इतके बाजार भांडवल गमावले आहे. इलॉन मस्क यांच्याकडे टेस्लाची 15% हिस्सेदारी आहे. त्यापैकी काही टक्के शेअरची मस्क यांनी विक्री केल्याचे बोलले जाते.  9 नोव्हेंबर 2022 टेस्लाचा शेअर 191.30 डॉलरवर आहे. मागील पाच सत्रात त्यात 15% अधिक घसरण झाली.