Online Shopping Sites: जेव्हा आपल्याला कोणतीही वस्तू खरेदी करायची असते तेव्हा आपण सहसा फ्लिपकार्ट(Flipkart) किंवा अॅमेझॉनला(Amazon) पहिली प्रायोरिटी देतो. बऱ्याच वेळा आपण इतर साईटवर आपल्याला हव्या असणाऱ्या उत्पादनाची किंमत(Price) चेक ही करत नाही. पण तुम्हाला माहित आहेत का? भारतीय बाजारापेठेत अशा बऱ्याच ऑनलाईन साईट(Online Shopping Site) आहेत ज्या फ्लिपकार्ट किंवा अॅमेझॉनपेक्षा कमी किंमतीत वस्तूंची विक्री करतात. चला आज अशा ऑनलाईन साईट बद्दल जाणून घेऊयात.
सरकारी ई मार्केटप्लेस (GEM)
सरकारने सुरू केलेल्या या बाजारातून तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करू शकता. हा तुमच्यासाठी एक फायदेशीर व्यवहार ठरू शकतो. एका सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की, येथे मिळणारे उत्पादन इतर ई-कॉमर्स(E-Commerce) साईटवर मिळणाऱ्या वस्तूंच्या तुलनेत खूपच स्वस्त आहेत. सरकारी पोर्टल(Govt. Portal) असूनही, येथे तुम्हाला होम डिलिव्हरीचा(Home Delivery) पर्याय दिला जाणार आहे. म्हणजेच येथून कोणताही माल खरेदी केल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवणार नाही.
इंडियामार्ट(IndiaMart)
‘IndiaMart’ ही साईट देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. विशेषत: त्या लोकांसाठी ज्यांना सर्व काही घाऊक किंमतीत खरेदी करण्याची सवय असते. या साइटचे वैशिष्ट्य सांगायचे तर येथे मिळणारी प्रत्येक वस्तू थेट उत्पादन युनिटमधून खरेदी करता येते म्हणजे कोणीही मध्यस्थी यामध्ये नसतो. तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही वस्तूसाठी, तुम्ही थेट निर्मात्याशी व्यवहार ठरवू शकता. यामुळेच येथे उपलब्ध असलेली प्रत्येक गोष्ट अत्यंत स्वस्तात ग्राहकांना उपलब्ध होते.
स्नॅपडील(Snapdeal)
स्नॅपडीलची जाहिरात(Advertise) तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिली असेल. स्नॅपडीलवरूनही तुम्ही स्वस्त वस्तू सहज खरेदी करू शकणार आहेत. याठिकाणी तुम्हाला आयफोन(iPhone) आणि गिझर अगदी स्वस्तात खरेदी करता येणार आहेत. येथून तुम्हाला आयफोन बॅक कव्हर खूप स्वस्तमिळतात. याशिवाय येथे तुम्हाला गारमेंट्स देखील उपलब्ध होत आहेत. तुमच्या कपड्यांची नवीन वर्षातील खरेदी तुम्ही इथूनच करू शकता.
यापुढे जर का तुम्हाला कोणत्याही वस्तूची खरेदी करायची असेल तर फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनसोबत आता इंडियामार्ट आणि स्नॅपडील सुद्धा चेक करायला विसरू नका.