Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Shopping Frauds and Consumer Protection: ऑनलाइन शॉपिंग करताना फसवणूक झाल्यास तक्रार नोंदवता येते का?

Online Shopping , Online

Online Shopping Frauds and Consumer Protection: ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हल्ली जवळपास सर्वच वस्तू ऑनलाइन उपलब्ध असतात. पण ऑनलाइन शॉपिंगमध्ये आपली फसवणूक झाली तर कोणाकडे तक्रार करावी? असा प्रश्न ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांना पडतो.

ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हल्ली जवळपास सर्वच वस्तू ऑनलाइन उपलब्ध असतात. पण ऑनलाइन शॉपिंगमध्ये आपली फसवणूक झाली तर कोणाकडे तक्रार करावी? असा प्रश्न ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांना पडतो. ऑनलाइन शॉपिंग खरच सुरक्षित आहे का? ऑनलाइन शॉपिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे आज आपण पाहणार आहोत.

जर तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीची ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली असेल तर त्याबाबत तुम्ही त्या वेबसाईट विरोधात आहात अशी तक्रार दाखल करु शकता. परंतु बऱ्याचदा याबाबतची तक्रार कुठे करावी? असा प्रश्न पडतो. अशाप्रकारची फसवणूक झाली असल्यास आपण ग्राहक न्यायालयात तक्रार करू शकता. ऑनलाईन फसवणुकीला विरोध करण्यासाठी बरेच कायदे बनवण्यात आले आहेत.  

फसवणुकीबाबत आहेत कडक कायदे

ग्राहकांची फसवणूक होऊ नये, तसेच त्यांची फसवणूक झाल्यास त्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने ग्राहक संरक्षण कायदा 1986, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अमेंडमेंट अॅक्ट, 2008 आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इंडियन मेडिकल असोसिएशन इत्यादींनी अनेक नियम व कायदे बनवले आहेत. ग्राहकांची फसवणूक झाल्यास तुम्ही ग्राहक न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर त्याबद्दल तक्रार करू शकता. तुम्ही फोनद्वारेही तक्रार नोंदवू शकता. यासाठी अधिकृत टोल फ्री क्रमांक 1800-11-4000 वर तुम्हाला कॉल करून तक्रार नोंदवावी लागेल. याशिवाय 14404 वर सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत कॉल करून तक्रार नोंदवता येते.

फसवणूक टाळण्यासाठी हे करा

वेबसाइटवरुन खरेदी करा

सोशल मीडियावर एखाद्या वस्तूचा फोटो दाखवून जाहिरात केली जाते. अशा वस्तूंची खरेदी करण्यापूर्वी त्या वेबसाइटवर रजिस्टर्ड ऑफिसचा पत्ता, लँडलाइन नंबर आणि इतर माहिती दिलेली आहे का हे तपासून घ्यावे. जर एखाद्या वेबसाइटवर वस्तूची किंवा कंपनीची संपूर्ण माहिती नसेल तर अशा वेबसाइटवरून शॉपिंग करणे टाळा. Secure Socket Layer (SSL) असलेल्या वेबसाइट्सवरुन शॉपिंग करावी. कारण या वेबसाईट्स HTTP: // ऐवजी HTTPS: // ने सुरु होतात आणि त्यांच्या अ‍ॅड्रेस बारमध्ये लॉक पॅडलॉक चिन्ह असते. या वेबसाइट्स यूजर्सने इनपुट केलेला डेटा संग्रहित करण्यास अधिक सक्षम आहेत. अनेकदा ग्राहक वेबसाइटचे लुक्स बघून खरेदी करण्याची चूक करतात. या वेबसाइट्स अनेकदा दिसताना आकर्षक दिसतात पण या वेबसाईट्सवर तुमची फसवणूक होवू शकते. या वेबसाइट्स सहज ओळखता येतात. या वेबसाईट्सवर उत्पादनांची देण्यात आलेली माहिती आणि वेबसाईटवरील शब्दांमध्ये अनेक चुका आढळून येतात.

क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करताना सावधान

ऑनलाइन शॉपिंग करताना ग्राहक क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा सर्रास वापर करतात. अशावेळी हे कार्ड्स वापरताना त्यांची माहिती ऑटो सेव्ह करू नका. यामुळे हॅकर्स पैशांची अफरातफर करु शकतात. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरण्याऐवजी तुम्ही COD म्हणजेच कॅश ऑन डिलीव्हरी या पर्यायाचा वापरु शकता. ज्यामुळे तुमची ऑनलाइन फसवणूक होणार नाही. त्याचप्रमाणे ऑनलाइन खरेदीच्या वेबसाईट्सना तुमच्या गुगल अकाउंटचा पासवर्ड देऊ नका. त्याचप्रमाणे पासवर्ड सतत बदलत रहा. पासवर्ड सेट करताना त्यामध्ये आकडे आणि विविध सिम्बॉल्सचा वापर करा. कारण सोपे पासवर्ड असलेले अकाउंट्स हॅकर्सना हॅक करणं सोपं जातं.

उत्पादनांची क्वालिटी तपासून पहा

विविध ऑफर्स युजर्सना एखादी वस्तू घेण्यास भुरळ पाडतात. त्यामुळे अनेकदा युजर्स जुन्या स्टॉकमधील वस्तू खरेदी करतात. त्यामुळे कमी खर्चाच्या नादात युजर्स खराब क्वालिटीच्या वस्तूंची खरेदी करतात. हे टाळण्यासाठी उत्पादनांची क्वालिटी तपासून पाहणे गरजेचे आहे. एसी, टिव्ही, फ्रीज, मायक्रोव्हेव सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करण्यापूर्वी त्यांची वॉरंटी तपासून पहावी.

पब्लिक वायफाय वापरण्यापूर्वी दोनदा विचार करा

मोफत उपलब्ध आहे म्हणून शॉपिंगसाठी तुम्ही पब्लिक वायफायचा वापर करत असाल तर सावधान. कारण असे केल्याने फसवणूक होऊ शकते. तेव्हा पब्लिक वायफायचा वापर करुन झाल्यावर अकाउंट लॉगआऊट करायला विसरु नका.