Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon Prime Sale Offer यावेळी चुकवू नका; पैशाची बचत होईल!

Amazon Prime Sale Offer यावेळी चुकवू नका; पैशाची बचत होईल!

ऑनलाईन खरेदी (Online Shopping) करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. उद्यापासून म्हणजेच शनिवारी (दि.23 जुलै) Amazon Prime Day Sale सुरू होणार असून तो 24 जुलैपर्यंत असणार आहे.

Amazon Prime Day 2022 Sale: ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. उद्यापासून म्हणजेच शनिवारी (दि.23 जुलै) Amazon Prime Day Sale 2022 सुरू होणार असून तो 24 जुलैपर्यंत असणार आहे. या महामेगा सेलमध्ये मोबाईल फोनवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. हा सेल फक्त Prime Members साठी उपलब्ध असणार आहे.

एक्सचेंज डिस्काऊंट आणि नो कॉस्ट ईएमआय

Amazon Prime Sale 2022

उद्यापासून सुरू होणाऱ्या Amazonच्या या सेलबद्दल खूप उत्सुकता आहे. कारण या सेलमध्ये स्मार्टफोनपासून, लॅपटॉप, आयपॅड, हेडफोन्सपासून घरगुती वस्तूंपर्यंत सर्व प्रकारच्या उत्पादनांवर सूट दिली जाणार आहे. याशिवाय Amazon Prime Day Sale मध्ये ग्राहकांना एक्सचेंज डिस्काऊंट आणि नो कॉस्ट ईएमआय (Exchange Discount & No Cost EMI)चा पर्यायही असणार आहे. या मेगा सेलसाठी Amazon ने ICICI आणि SBI Bank यांच्यासोबत पार्टनरशिप केली आहे. याचाही ग्राहकांना फायदा घेता येणार आहे.

Amazon Prime मेंबरशीप फी काय आहे?

Amazon Prime सेलमध्ये सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे Amazon Prime मेंबरशीप असणं गरजेचं आहे. हा सेल फक्त प्राईम मेंबर्ससाठी आहे. Amazon ची एका महिन्याची प्राईम मेंबरशीप 179 रुपये आहे. तीन महिन्यांसाठी 459 रूपये आणि एका वर्षाची मेंबरशीप 1499 रूपये आहे.

Amazon Pay बॅलन्स वापर करा

Amazon Prime Sale-1 2022

Amazon Pay बॅलन्सचा वापर करून तुम्ही तुमच्या पैशांची आणखी बचत करू शकता. ज्यामुळे तुम्हाला या ऑफर्सचा डबल धमाका आनंद मिळू शकेल. यापूर्वी केलेल्या छोट्या-मोठ्या वस्तुंच्या खरेदीतून तुमच्या Pay बॅलन्समध्ये बऱ्यापैकी रिवॉर्ड्स जमा झाले असतील तर त्याचा वापर तुम्ही या मेगासेलमध्ये नक्की करू शकता.

बॅंकेच्या ऑफर्स डीलचा फायदा घ्या!

Amazon Pay Offers

Amazon Prime Day Sale मध्ये खरेदी करण्यापूर्वी, त्या उत्पादनावर बॅंकांनी काही ऑफर्स किंवा सवलत दिली आहे का? हे तपासून घ्या आणि मगच खरेदी करा. Amazon ने या सेलसाठी ICICI आणि SBI बॅंकेशी पार्टनरशीप केली आहे. तसेच एसबीआय बॅंक कार्डधारकांना 10 टक्के सूटही देणार आहे.

WOW Deals चुकवू नका

amazon Prime Sale-2 2022

Amazon Prime Day Sale मध्ये 23 आणि 24 जुलै रोजी संध्याकाळी 4 ते 6 या दरम्यान स्पेशल Wow Deals असणार आहेत. यासाठी विशेष ऑफर दिल्या जाणार आहेत. या ऑफर्सचाही लाभ घेण्यास विसरू नका. 

तुम्हाला जर Amazon Prime Day Sale वरून भरपूर खरेदी करायची असेल तर तुम्ही त्याची यादी तयार करून या सेलला सामोरे जा आणि वर सांगितल्याप्रमाणे विविध ऑफर्सचा वापर करून मनमुराद खरेदीचा आनंद लुटा.