Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Post Office Scheme: आयकर वाचविण्यासाठी पोस्टाच्या 'या' योजना आहेत लय भारी, बचतही होईल बक्कळ

Post Office Scheme

Post Office Scheme: पोस्टाच्या योजना तुमचा आयकर तर वाचवतील सोबतच तुम्हाला चांगली गुंतवणूक केल्यामुळे चांगला परतावाही देतील. थोडक्यात काय तर फायदा तुमचाच आहे. कोणत्या आहेत 'या' योजना? हे जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

Post Office Scheme: भारत सरकारच्या पोस्ट ऑफिसमध्ये अनेक सरकारी योजना आहेत, ज्यामध्ये तुम्हाला पैसे साठवता येतील. पोस्टाकडून या गुंतवणुकीवर चांगला व्याजदरही मिळत आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला आयकर वाचवण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकते. पोस्ट ऑफिसच्या 5 योजनांमध्ये आयकर खात्याच्या(Income Tax) सेक्शन 80सी नियमातंर्गत मोठा फायदा होणार आहे. तुम्हाला बचतीसह किंवा कर सवलतीचा (Tax Deduction) लाभ या अंतर्गत घेता येईल. थोडक्यात काय तर, एकाच योजनेवर तुम्हाला दुहेरी फायदा होणार आहे. तुम्हीही 31 मार्च 2023 पूर्वी प्राप्तिकर सवलत मिळविण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट खात्याच्या योजना तुम्हाला फायदेशीर ठरतील. गुंतवणुकीसंबंधीची कागदपत्रे जोडून तुम्हाला आयकर रिटर्न दाखल करताना कर सवलतीसाठी दावा दाखल करता येऊ शकतो. चला तर या कोणत्या योजना आहेत, त्याची माहिती जाणून घेऊयात.

  1. तुम्हाला जर कर सवलत घ्यायची असेल, तर तुम्ही राष्ट्रीय निवृत्ती योजनेत(NPS) गुंतवणूक करू शकता. आयकर अधिनियम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी या योजनेचा  तुम्हाला फायदा होऊ शकतो.  यासोबतच या योजनेत रिटायरमेंट फंडचाही लाभ गुंतवणूकदाराला मिळतो. उतारवयातील आर्थिक तरतूदीसाठी ही योजना सर्वोत्तम आहे.
  2. अनेक जण सध्या पब्लिक प्रोव्हिडंड फंड(PPF) स्कीममध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत. या योजनेवर सध्या 7.1 टक्क्यांचा परतावा मिळत आहे. या योजनेमध्ये 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळत आहे.
  3. पोस्ट खात्यातील ईपीएफ(EPF) योजनेतील गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला 8.1 टक्के व्याज मिळत आहे. या योजने अंतर्गत आयकर सवलतीचा लाभ ही घेता येतो. आयकर अधिनियमाची कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची सवलत या योजनेमध्ये मिळत आहे.
  4. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र(National Savings Certificate) ही पोस्टाची एक अल्पबचत योजना असून यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला व्याजदर  मिळते. विशेष म्हणजे 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत आयकर सवलत मिळविता येते. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी हा 5 वर्षांचा असून या योजनेत तुम्ही 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करु शकता.
  5. पोस्ट खात्याची अटल पेन्शन योजनेत(Atal Pension Scheme) अत्यंत कमी मासिक हप्ता भरुन तुम्ही दर महिन्याला निवृत्ती रक्कम मिळवू शकणार आहात. या योजनेत समजा विमाधारकाचा मृत्यू झाला तर, त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. याशिवाय योजनेतंर्गत गुंतवणुकीवर 80C नियमान्वये आयकर सवलत ही मिळत आहे.
  6. पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव(FD) योजनेत गुंतवणूक केल्यानंतर आयकर अधिनियमाच्या कलम 80C अंतर्गत लाभ मिळतो. याशिवाय गुंतवणूकदारांना 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षांची असून व्याजदरात सतत बदल होत असतो.ज्याचा फायदा तुम्हाला घेता येऊ शकतो.