Post Office Schemes for Tax Savings: बचतीवर चांगला परतावा मिळणे आणि भांडवलावरील सुरक्षिततेची हमी मिळणे त्याचबरोबर सर्वात महत्वाचे आयकर वाचवणे. ही सर्व वैशिष्ट्ये एका योजनेत असणे यापेक्षा चांगले काय असू शकते. या सर्व बाबी एका योजने असणे शक्य आहे त्या म्हणजे पोस्ट ऑफिसच्या योजना. भारत सरकारच्या पोस्ट ऑफिस योजना भरपूर आहेत, त्यापैकी काही योजना पुढीलप्रमाणे. या सर्व योजनांना आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट मिळते. पोस्ट ऑफिसच्या योजना लहान बाळापासून ते वयोवृद्ध व्यक्तीसाठी सुद्धा आहे.
Table of contents [Show]
सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana)
सुकन्या समृद्धी योजना खाते मुलीच्या नावाने उघडता येते. खाते ओपन करतांना मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असावे. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर ती स्वतः त्या अकाऊंटची मालक बनते. सध्या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये 7.6 टक्के व्याज मिळत आहे. हे अकाऊंट एका वर्षात किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करून उघडता येते. या प्लॅनमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर तिहेरी कर लाभ देखील उपलब्ध आहे.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund)
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचा उद्देश दीर्घ काळासाठी गुंतवणूक करणे आणि इतर कोणत्याही दीर्घकालीन उद्देशासाठी निधी गोळा करणे हा आहे. बँकांव्यतिरिक्त पोस्ट ऑफिसमध्येही पीपीएफ खाती उघडता येतात. सध्या, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर 7.1 टक्के वार्षिक दराने व्याज मिळत आहे, जे वार्षिक आधारावर चक्रवाढ होते. याशिवाय पीपीएफ योजनेत तिहेरी कर लाभ देखील उपलब्ध आहे. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, पीपीएफमध्ये वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर केवळ कर सूट उपलब्ध नाही, तर त्यावर मिळणारे व्याज आणि मुदतपूर्तीच्या वेळी मिळालेली रक्कम देखील करमुक्त आहे.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Savings Certificate)
जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नसताना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये किमान रु 1000 जमा करता येतात. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 5 वर्षांमध्ये परिपक्व होते, ज्यावर सध्या 7% दराने व्याज मिळत आहे. NSC मधील गुंतवणुकीवर 80C अंतर्गत टॅक्स सवलत देखील उपलब्ध आहे. मुदतपूर्तीच्या वेळी स्लॅबनुसार व्याजावर टॅक्स आकारला जातो. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटची एक खास गोष्ट म्हणजे गॅरंटी म्हणून जमा करूनही कर्ज घेता येते.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizens Savings Scheme)
60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे वृद्ध पोस्ट ऑफिसद्वारे वरिष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करू शकतात. याशिवाय ज्यांचे वय 55 वर्षांहून अधिक आहे, ते निवृत्त झालेले लोकही यामध्ये गुंतवणूक करू शकतात. या योजनेत 5 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते, जी मुदतपूर्तीनंतर 3 वर्षांसाठी पुन्हा नूतनीकरण करता येते. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर सध्या वार्षिक 8 टक्के दराने इंटरेस्ट मिळत आहे, जे दर तीन महिन्यांनी दिले जाते. SCSS मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर 80C अंतर्गत टॅक्स बेनीफिट उपलब्ध आहे, परंतु व्याज पूर्णपणे करपात्र आहे.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (Post Office Time Deposit)
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट्स बँकांच्या मुदत ठेवी सारखेच असतात. दर तीन महिन्यांनी व्याजदरांचे पुनरावलोकन केले जाते. यामध्ये किमान गुंतवणूक 1000 रुपये आहे. जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. 5 वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केल्यास आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत आयकर सूट मिळते. सध्या, 5 वर्षांच्या ठेवीवर वार्षिक 7% दराने व्याज उपलब्ध आहे. असायचे.