Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पोस्ट ऑफिसच्या ATM Card बद्दल तुम्हाला 'या' गोष्टी माहिती आहे का?

Post Office ATM Card

Image Source : www.businesstoday.in

Post Office ATM Card: जर तुमचेही अकाउंट पोस्ट ऑफिसमध्ये असेल तर त्याच्या एटीएम(ATM) वर ट्रान्झॅक्शन चार्ज(Transaction Charge) किती आकारला जातो? एका दिवसात किती रक्कम काढता येते, सारख्या प्रश्नांची उत्तरं आजच्या लेखातून जाणून घ्या.

Post Office ATM Card: हल्ली आपण सगळेच पैसे काढण्यासाठी एटीएम(ATM) कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. सरकारी पोस्ट खात्याने(Government Post Department) देखील त्यांच्या ग्राहकांना ही सुविधा दिली आहे. पोस्ट ऑफिसमध्ये सेविंग अकाउंट(Saving Account) असणाऱ्यांना एटीएम(ATM) कार्डची सुविधा देण्यात आली आहे. बँक एटीएम कार्डप्रमाणेच या एटीएम(ATM) कार्डचा वापर केला जातो. तुमच्याकडेही पोस्टात सेव्हिंग अकाउंट आहे आणि तुम्ही देखील ATM कार्ड वापरत असाल तर, त्यावरील ट्रान्झॅक्शनचे(Transaction) नियम जाणून आजच्या लेखातून जाणून घ्या.

ATM मधून एका दिवसात किती रक्कम काढता येते?(Withdrawn from ATM in a day?)

पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार एका दिवसात एटीएम(ATM) कार्डमधून 25,000 रुपये काढता येतात. तुम्हाला एका ट्रान्झॅक्शनमध्ये(Transaction) 10,000 रुपयांपर्यंतची रक्कम काढता येते.

ट्रान्झॅक्शन चार्ज किती असतो?(Transaction charge?)

तुम्ही मेट्रो सीटीतील रहिवाशी असाल तर, एका महिन्यात दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून तुम्ही 3 वेळा फ्री ट्रान्झॅक्शन(3 time free transaction) करू शकता. तसेच नॉन मेट्रो सीटीसाठी 5 वेळा फ्री ट्रान्झॅक्शन(5 time free transaction) करण्याची सुविधा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पोस्ट ऑफिसच्या एटीएममधून(ATM) ट्रान्झॅक्शन केल्यास कोणतेही शुल्क आकारले जात नाही. दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून(ATM) फ्री ट्रान्झॅक्शन लिमिट संपल्यानंतर(Transaction Limit Over) प्रत्येक ट्रान्झेक्शनला 20 रुपये + जीएसटी(GST) इतकी रक्कम द्यावी लागते.

इतर महत्त्वाची माहिती(Other important information)

तुम्ही पोस्ट ऑफिसचे एटीएम(ATM) कार्ड रिप्लेस करणार असाल तर, पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटनुसार 300 रुपये + जीएसटी(GST) इतकी रक्कम भरावी लागणार आहे. याशिवाय ब्रँचमधून पिन जनरेट करताना 500 रूपये + जीएसटी(GST) आणि अकाउंटमध्ये पैसे नसल्यामुळे ट्रान्झॅक्शन डिक्लाइन झाल्यास 20 रुपये + जीएसटी(GST) इतकी रक्कम आकारली जात आहे. पोस्ट ऑफिसचे एटीएम कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी 125 रुपये + जीएसटी(GST) मेंटेनन्स चार्ज द्यावा लागतो. तसेच पोस्ट ऑफिसचे डेबिट कार्ड(Debit Card) वापरणाऱ्या व्यक्तीला एसएमएससाठी(SMS) दरवर्षी 12 रुपये आकारले जात असतात.