Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

TDS on Cryptocurrency: क्रिप्टो व डिजिटल मालमत्तेवर टीडीएस नाही लागणार?

tds

1 जुलै 2022 पासून डिजिटल मालमत्ता क्रिप्टो (Crypto) आणि NFT च्या हस्तांतरणावर (Transfer) 1 टक्के टीडीएस लागू झाला आहे. पण हा टीडीएस (Tax Deducted at Source - TDS) सीबीडीटी (CBDT) ने निर्देषित केलेल्या रकमेपेक्षा जास्ता असेल तरच लागू होणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी 2022 च्या अर्थसंकल्पात घोषित केल्यानुसार, आभासी डिजिटल मालमत्ता (Virtual Digital Asset) जसे की, क्रिप्टो आणि NFT च्या देवाणघेवाणीवर टीडीएस (TDS on Cryptocurrency in India) आजपासून म्हणजे 1 जुलै, 2022 पासून लागू झाला आहे. त्यामुळे व्हर्च्युल डिजिटल असेट (VDA) खरेदी करताना, खरेदीदाराने विक्रेत्याला पेमेंट करण्यापूर्वी भरलेल्या रकमेवर 1 टक्के दराने कर (Tax) कपात करणे आवश्यक असणार आहे.

पण, क्रिप्टो आणि एनएफटीमध्ये गुंतवणूक (Investment in Crypto & NFT) करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. ती म्हणजे डिजिटल व्यवहार (Digital Transaction) करताना या व्यवहारांची रक्कम संबंधित विभागाने निर्दिष्ट केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तरच टीडीएस  (Tax Deducted at Source - TDS) लागू होणार आहे. इथे संबंधित विभागाने ठरवून दिलेली मर्यादा ही एका व्यवहारासाठी किंवा अनेक व्यवहारांसाठी लागू होऊ शकते. मग नेमकं व्हर्च्युअल डिजिटल असेट (VDA) आणि क्रिप्टो (Crypto)च्या खरेदी आणि विक्रीवर टीडीएस (TDS Crypto) कधी लागू होणार? याबाबत आपण अधिक माहिती घेऊ.


नेमकं VDA आणि Crypto वर TDS कधी लागू होणार नाही?

इन्कम टॅक्स कायद्यानुसार, पुढील परिस्थितीत क्रिप्टो आणि व्हर्च्युअल डिजिटल असेटवर टीडीएस लागू होणार नाही.

अ) 'एका विशिष्ट व्यक्तीने' एका आर्थिक वर्षात 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिली नसल्यास, किंवा
ब) वर नमूद केलेल्या 'एका विशिष्ट व्यक्ती' व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीने दिलेली रक्कम एका आर्थिक वर्षात 10 हजार रूपयांपेक्षा जास्त नसेल.

इन्कम टॅक्स कायद्यानुसार 'एक विशिष्ट व्यक्ती' कोण आहे?

इन्कम टॅक्स कायदा, 1961 च्या कलम 194S नुसार, एक विशिष्ट व्यक्ती पुढीलप्रमाणे आहे:

अ) कोणतीही एक व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) ज्याचे व्यवसाय किंवा उद्योगातील नफा या शीर्षकाखाली कोणतेही उत्पन्न नाही किंवा,
ब) 'व्यवसाय किंवा उद्योगातील नफा या शीर्षकाखाली उत्पन्न असलेले वैयक्तिक किंवा हिंदू अविभक्त कुटुंब (HUF). तसेच त्याच्या व्यवसायातील एकूण विक्री/एकूण पावत्या/उलाढाल ही 1 कोटी रूपयांपेक्षा जास्त नाही. आणि एका प्रोफेशनसाठी एका आर्थिक वर्षात संबंधिताचे 50 लाखांपेक्षा अधिक टर्न ओव्हर नसावा.

VDA आणि Crypto वरील TDS वर कायदा काय म्हणतो?

नवीन कायद्यानुसार (1 जुलै, 2022 पासून लागू) व्हर्च्युअल डिजिटल असेट (VDA) खरेदी करणार्‍याने विक्रेत्याला (भारतीय निवासी) दिल्या जाणाऱ्या एकूण रकमेवर 1 टक्के टीडीएस वजा करणे आवश्यक आहे. हा टॅक्स सदर रक्कम जमा करताना किंवा संबंधित व्यक्तीला देताना कापणे आवश्यक आहे.

क्रिप्टो किंवा डिजिटल व्यवहारात विक्री करणाऱ्याचा पॅन क्रमांक (Pan Card) उपलब्ध नसेल तर व्हर्च्युअल डिजिटल असेट ट्रान्सफर करताना 20 टक्के टॅक्स कापला जाईल. त्याचबरोबर, इथून पुढे, जर एखाद्या व्यक्तीने (विक्रेत्याने) आयकर रिटर्न (ITR) भरले नसेल, तर त्याच्याकडून सर्वाधिक असा 5 टक्के टीडीएस कापला जाईल. जो सध्या 1 टक्काच आहे. या प्रकरणात एक किंवा दोन व्हर्च्युअल असेटीची देवाणघेवाण झाली असेल तरीही टीडीएस लागू होणार आहे.