Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पॅन कार्ड (Pan Card) म्हणजे काय? पॅन कार्डचे महत्त्व किती

पॅन कार्ड (Pan Card) म्हणजे काय? पॅन कार्डचे महत्त्व किती

Image Source : www.indiamart.com

PAN card म्हणजेच परमनंट अकाऊंट नंबर यालाच मराठीत कायमस्वरूपी खाते क्रमांक असे देखील म्हणतात. प्रत्येक ठिकाणी पॅन कार्ड आवश्यक झाले आहे. सरकारी कामासाठी पॅन कार्ड व्यतिरिक्त कोणतेही जास्त पुरावे द्यावे लागत नाहीत.

PAN card हे भारतीय आयकर कायदा, 1961 द्वारे भारतात लॅमिनेट कार्ड म्हणून केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) देखरेखी खाली आयकर विभागाने जारी केले आहे आणि ते ओळखीचा एक महत्त्वाचा पुरावा म्हणुन मानले जाते. विभागाकडून उपलब्ध असलेल्या पॅन कार्डमध्ये 10-अंकी क्रमांक दिला जातो. प्रत्येक ठिकाणी पॅन कार्ड असणे आवश्यक झाले आहे, जर तुम्ही बँकेत जास्त रकमेचे व्यवहार करतात तर तिथे देखील तुम्हाला पॅन कार्ड आवश्यक आहे.

पॅनकार्ड हा संपूर्ण भारतातील सर्व करदात्यांना दिलेला ओळख क्रमांक आहे. भारतीय आयकर पॅन कार्ड तुमच्या एटीएम कार्डसारखेच असते. यामध्ये तुमचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, तुमचा फोटो, सही आणि कायमस्वरूपी खाते क्रमांक दिलेला असतो. यामुळे सरकारी कामासाठी पॅन कार्ड व्यतिरिक्त कोणतेही जास्त पुरावे द्यावे लागत नाहीत. 

पॅन कार्ड असणे किती महत्त्वाचे आहे?

बँक खाते उघडणे
बँक अकाऊंट उघडण्यासाठी पॅन कार्ड असणे महत्वाचे आहे. कोणत्याही बँकेत बचत किंवा चालू खाते असल्यास पॅन कार्ड आवश्यक असते. यासह, जर तुम्ही कोणत्याही बँक किंवा इतर वित्तीय संस्थेत डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला पॅन कार्ड द्यावे लागते.

आयटी रिटर्न भरताना 
ई-फायलिंग रिटर्नच्या उद्देशाने आयकर वेबसाइटवर लॉग इन करू इच्छिणाऱ्या करदात्यांनी त्यांचा पॅन क्रमांक देणे आवश्यक आहे. आयकर विभाग पेपरलेस इन्कम टॅक्स रिटर्न फाइलिंग सिस्टमकडे वाटचाल करत असताना, करदात्यांना त्यांचे रिटर्न वेबसाइटद्वारे भरावे लागतील, जेथे नोंदणीसाठी त्यांचे पॅन क्रमांक आवश्यक आहेत.

दागिने खरेदी करण्यासाठी पॅन आवश्यक
5 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे दागिने खरेदी केल्यास तुम्हाला दुकानात खरेदीच्या वेळी पॅन कार्डचा तपशील देणे गरजेचे आहे.

गाडी खरेदी किंवा विक्री
जर तुम्ही वाहन खरेदी करत असाल किंवा वापरलेली कार किंवा वाहन 5 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीला विकत असाल तर तुम्हाला पॅन कार्ड गरजेचे आहे.

विमा प्रीमियम जमा करताना
आयकरच्या नियमांनुसार, जर तुम्ही वार्षिक विमा प्रीमियम 50000 रुपयांपेक्षा जास्त जमा केले तर तुम्हाला पॅन नंबर गरजेचं आहे.

पॅन कार्ड कसे काढावे 

पॅन कार्ड तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन सुद्धा काढू शकता. 
• ऑफलाईन पॅन कार्ड काढण्यासाठी जवळच्या केंद्रात जाऊन अर्ज, आवश्यक कागदपत्रे, आणि फी भरून तुम्हाला तुमचे पॅनकार्ड मिळू शकते. अर्ज भरल्याचा 45 दिवसात पॅन कार्ड आपण दिलेल्या घरच्या पत्त्यावर पाठवले जाते.  
• ऑनलाईन पॅन कार्ड काढण्यासाठीNSDL किंवा UTIITSL या वेबसाइटवर फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे जोडून आणि शुल्क भरून फॉर्म सबमिट करू शकता. अर्ज भरल्याचा 45 दिवसात पॅन कार्ड आपण दिलेल्या घरच्या पत्त्यावर पाठवले जाते.    

पॅन कार्डसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

• Identity Proof  
(पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, केंद्र किंवा राज्य सरकारने जारी केलेले फोटो ओळखपत्र)
• Address proof : 
(आधार कार्ड, घरचे वीज बिल, मतदार ओळखपत्र, पोस्ट ऑफिस पासबुक)
• जन्म प्रमाणपत्र: 
(आधार कार्ड, मतदारांचे फोटो ओळखपत्र, मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्र, महापालिका प्राधिकरणाद्वारे जारी केलेले जन्म प्रमाणपत्र) 
• फोटो

पॅन कार्ड स्टेटस

पॅन कार्ड फॉर्म सबमिट केल्यावर त्याचा स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही या लिंकवर क्लिक केल्यावर अॅप्लिकेशन नंबर सबमिट करून पॅन कार्डची माहिती घेऊ शकता.  

पॅन कार्ड हरवले तर काय करावे

जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड गमावले असेल, तर काळजी करण्यासारखे काही नाही, तुम्ही डुप्लिकेट पॅन कार्डसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता. NSDL किंवा UTIITSL वेबसाइटवर लॉगिन करा, भारतीय नागरिकांसाठी फॉर्म 49-A भरा किंवा तुमच्या पॅन कार्डच्या डुप्लिकेट कॉपीसाठी ऑनलाईन पैसे भरा. पॅन कार्ड तुम्हाला 45 दिवसांच्या आत पाठवले जाईल.

Image Source - https://bit.ly/3uYfbiX