Market Opening Bell: शेअर मार्केट सुरू होताच निफ्टी, सेन्सेक्स आपटले; आरबीआय पतधोरणाकडे सर्वांचे लक्ष
मागील चार दिवसांपासून शेअर बाजार सतत वर जात होता. मात्र, आज सकाळी शेअर मार्केट उघडताच निफ्टी आणि सेन्सेक्स आपटले. बँक निफ्टी निर्देशांकही 130 अंकांनी खाली आला. आज आरबीआय पतधोरण जाहीर करणार आहे, त्याचा परिणाम भांडवली बाजारावर दिसून आला. जर दरवाढ झाली तर त्याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर होऊ शकतो. तसेच चौथ्या तिमाहीच्या निकालाचाही शेअर बाजारावर परिणाम होऊ शकतो.
Read More