Trade setup for today: गुरुवारी, 5 जानेवारी रोजी शेअर बाजार सुरू झाल्यावर, सेन्सेक्स, निफ्टी वेग धरला होता. सकाळी 9 वाजून 17 मिनिटांनी बीएसई सेन्सेक्स 62.44 अंकांच्या म्हणजेच 0.10 टक्क्यांच्या वाढीसह 60 हजार 719.89 अंकांवर ट्रेड करत होता. त्याचप्रमाणे निफ्टी (NSE) 13 अंकांच्या म्हणजेच 0.07 टक्क्यांच्या वाढीसह 18 हजार 55.95 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.
After the stock market opens- या शेअरमध्ये, सेन्सेक्समध्ये वाढ दर्शविली
गुरुवारी बीएसई (BSE) सेन्सेक्सच्या सुरुवातीच्या व्यवहारात हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे (HUL) शेअर सर्वाधिक वेगाने ट्रेड करत होते. त्याचप्रमाणे सन फार्मा (Sun Pharma), आयटीसी (ITC), एनटीपीसी (NTPC), एशियन पेंट्स (Asian Paints), रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries), टाटा स्टील (Tata Steel), इंडसइंड बँक (IndusInd Bank), लार्सन अँड टुब्रो (L&T), एसबीआय (SBI), कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank), नेस्ले इंडिया (Nestle India), भारती एअरटेल (Bharti Airtel), अल्ट्राटेक सिमेंट (Ultratech Cement), एचडीएफसी (HDFC), टीसीएस (TCS), टाटाचे मोटर्स (Tata Motors) आणि अॅक्सिस बँक (Axis Bank) आदींचे भाव वधारत होते.
तर दुसरीकडे, बजाज फायनान्स (Bajaj Finance) 4.72 टक्क्यांनी घसरला आहे. याशिवाय बजाज फिनसर्व्ह, पॉवरग्रीड, महिंद्रा अँड महिंद्रा आणि मारुती सुझुकीचे शेअर्सही घसरत आहेत.
Opinion of stock market expert- आज बाजार तज्ज्ञांमध्ये या स्टॉक्सची चर्चा
आज, शेअर बाजार तज्ज्ञांमध्ये अदानी पोर्ट, बजाज फायनॅन्स, मॅरिको, रत्नाकर बँक लिमिटेड या स्टॉकविषयी चर्चा होत आहे. हे स्टॉक येत्या काळात गुंतवणुकदारांना चांगला परतावा मिळवून देणार आहेत, कारण कंपन्यांनी तशी कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्यांच्या शेअर्सचा दर वाढू शकतो, असे गुंतवणूक तज्ज्ञ विवेक नाडकर्णी यांनी सांगितले. तर नेमकी कंपनीची कामगिरी आणि ज्यामुळे त्यांचा भाव वधारेल ते पाहुयात-
- अदानी पोर्ट्स आणि सेझ (Adani Ports And SEZ): जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांची कंपनी असलेल्या अदानी पोर्ट्सने डिसेंबरमध्ये 25.1 दशलक्ष टन मालाची हाताळणी केली आहे. वर्षागणिक त्यांची 8 टक्क्यांनी वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. डिसेंबरमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षाच्या 9 महिन्यांत, अदानी समूहाच्या या कंपनीने वार्षिक आधारावर 8 टक्के वाढ नोंदवली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत त्याचे मालवाहू प्रमाण 253 दशलक्ष टनांवर पोहोचले आहे.
- बजाज फायनॅन्स (Bajaj Finance): बजाज फायनान्स या नॉन-बँकिंग फायनान्स व्यवसायातील कंपनीने डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत 7.8 दशलक्ष कर्ज वाटप केले आहे. वर्षभरापूर्वीच्या काळात ते 7.4 दशलक्ष होते. गेल्या तिमाहीत बुक केलेली कर्जे ही कंपनीच्या व्यवसायाच्या दृष्टीने आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. कंपनीतील तरलतेची स्थिती निरोगी राहते. बजाज फायनान्सकडे 12 हजार 750 कोटींची हेड प्लस तरलता कायम आहे.
- मॅरिको (Marico): रोजच्या वापरातील वस्तू (FMCG- Fast-moving consumer goods) व्यवसायातील दिग्गज मॅरिकोने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने म्हटले आहे की वर्षागणिक त्यांच्या व्यवसायात एक अंकी वाढ नोंदवली गेली आहे. कंपनीला अपेक्षा आहे की आगामी काळात तिचे एकूण आणि ऑपरेटिंग मार्जिन सुधारेल. कंपनीला येत्या काळात ऑपरेटिंग नफ्यात किरकोळ वाढ अपेक्षित आहे.
- रत्नाकर बँक लिमिटेड (Ratnakar Bank Ltd.): 31 डिसेंबरपर्यंत रत्नाकर बँकेच्या ढोबळ प्रगतीमध्ये वार्षिक आधारावर 14 टक्के वाढ झाली आहे आणि ती 68 हजार 371 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कंपनीचे कर्ज 6 टक्के वाढले आहे तर किरकोळ कर्ज 12 टक्के वाढले आहे. रत्नाकर बँकेच्या घाऊक कर्जात 17 टक्के वाढ झाली आहे.