Poha Price Hike: भारतीयांच्या नाष्ट्याची पंचाईत; कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे पोहे महागले
साळीपासून पोहे बनवले जातात. बाजारात साळीची कमतरता असल्याकारणाने पोह्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. देशातील छत्तीसगढ, गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यांत पोहे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असते. परंतु कच्च्या मालाचा तुटवडा असल्याने पोहे प्रक्रिया उद्योजकांनी ही भाववाढ केली आहे. पोहे भाववाढीमुळे अगोदरच महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांच्या खिशाला अधिक कात्री लागणार आहे.
Read More