Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

poha manufacturing business : असा सुरु करा पोहे मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस

poha manufacturing business

Image Source : www.youtube.com

आज आपण पोहे बनवणाऱ्या युनिट (Poha Manufacturing) विषयी सांगणार आहोत. पोहे बनवणे आणि पचवणे दोन्हीही सोपे आहे. त्यामुळेच की काय पोह्यांची मागणी मार्केटमध्ये वाढत आहे.

जर तुम्हालाही कोणता व्यवसाय सुरु करायचा आहे तर आज आम्ही तुमच्यासाठी एक छान कल्पना घेवून आलो आहोत. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी खूप कमी पैशांची आवश्यकता असते. हा एक असा व्यवसाय आहे ज्याची डिमांड प्रत्येक महिन्याला वाढत जाते. आम्ही सांगत आहोत पोह्याविषयी. पोह्याशिवाय लोकांचा सकाळचा नाश्ता अपूर्ण ठरतो. आज आपण पोहे बनवणाऱ्या युनिट (Poha Manufacturing) विषयी सांगणार आहोत. पोहे बनवणे आणि पचवणे दोन्हीही सोपे आहे. त्यामुळेच की काय पोह्यांची मागणी मार्केटमध्ये वाढत आहे. हिवाळा असो वा उन्हाळा प्रत्येक ऋतूमध्ये लोकं पोहे अगदी चवीने खातात. हा व्यवसाय सुरु करून तुही खूप चांगली कमाई करू शकता. पोहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट बसवून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करू शकता.

पोहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट व्यवसाय खर्च (Pohe Manufacturing Unit Business Expenses)

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या (KVIC- Khadi and Village Industries Commission) प्रकल्प अहवालानुसार, पोहे उत्पादन युनिटची किंमत सुमारे 2.43 लाख रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 90% पर्यंत कर्ज मिळेल. अशा परिस्थितीत पोहे मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुमारे 25000 रुपयांची व्यवस्था करावी लागेल.

उत्पादन युनिटमध्ये आवश्यक वस्तू (Items required in a production unit)

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुमारे 500 चौरस फूट जागा आवश्यक आहे. पोहे मशीन, भट्टी, पॅकिंग मशीन आणि ड्रमसह लहान वस्तू आवश्यक असतील. केव्हीआयसीच्या (KVIC) अहवालात असे म्हटले आहे की, व्यवसायाच्या सुरुवातीला काही कच्चा माल आणावा. नंतर हळूहळू त्याचे प्रमाण वाढवा. अशा प्रकारे, तुम्हाला चांगला अनुभव मिळेल तसेच व्यवसाय देखील वाढेल.

अशा प्रकारे तुम्हाला कर्ज मिळेल (This is how you get a loan)

KVIC च्या या अहवालानुसार, जर तुम्ही प्रकल्प अहवाल तयार केला आणि ग्रामोद्योग रोजगार योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज केला तर तुम्हाला सुमारे 90% कर्ज मिळू शकते. ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी KVIC कडून दरवर्षी कर्ज दिले जाते. तुम्हीही याचा लाभ घेऊ शकता.

कमाई (Earnings)

प्रकल्प अहवालानुसार प्रकल्प सुरू केल्यानंतर कच्चा माल घ्यावा लागतो. त्यासाठी सुमारे सहा लाख रुपये खर्च येणार आहे. याशिवाय 50,000 रुपये इतरत्र खर्च करावे लागतील. अशा प्रकारे सुमारे 1000 क्विंटल पोह्याचे उत्पादन होईल. ज्यावर उत्पादन खर्च 8.60 लाख रुपये येईल. तुम्ही 1000 क्विंटल पोहे सुमारे 10 लाख रुपयांना विकू शकता. म्हणजेच तुम्ही जवळपास 1.40 लाख रुपये कमवू शकता.