Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SIP Vs SSY: दोन हजारांची एसआयपी की सुकन्या समृद्धी योजना, जाणून घ्या फायद्याचे गणित काय?

SIP Vs SSY which is Best

SIP Vs SSY: मार्केटमध्ये सध्या गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय आहेत. गुंतवणूकदाराने आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार त्याची निवड केली पाहिजे. आज आपण SIP आणि Sukanya Samruddhi Yojana यापैकी कोणता चांगला पर्याय ठरू शकतो, हे समजून घेणार आहोत.

SIP Vs SSY: प्रत्येक गुंतवणूक पर्यायाचे उद्दिष्ट आणि त्यातून मिळणारा परतावा हा वेगवेगळा असतो. त्यामुळे वेगवेगळ्या पर्यायातून समान परतावा मिळणे अवघड आहे. पण तरीही काही जणांना दोन पर्यायांपैकी एकच पर्याय निवडायचा असतो. त्यावेळी त्या गुंतवणूक पर्यायातून मिळणाऱ्या फायद्याव्यतिरिक्त आपले आर्थिक उद्दिष्ट काय आहे? हे समजून घेणे तितकेच गरजेचे आहे.

आज आपण म्युच्युअल फंडमधील सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan) आणि सुकन्या समृद्धी योजना यापैकी गुंतवणुकीसाठी कोणती योजना फायदेशीर ठरू शकते. हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम आपण सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samrudhi Yojana) काय आहे? ती कोणासाठी लागू आहे. तसेच त्याचा कालावधी आणि त्यातून मिळणारा परतावा किती आहे. हे पाहणार आहोत. त्यानंतर एसआयपी म्हणजे काय? त्यामध्ये किती रुपयांपासून गुंतवणूक करता येते? या गुंतवणुकीत जोखीम किती? आणि अपेक्षित परतावा किती मिळतो? हे समजून घेणार आहोत.

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samrudhi Yojana)

सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारद्वारे मुलींसाठी राबवली जाणारी सरकारी गुंतवणूक योजना आहे. केंद्राने ‘बेटी बचाओ और पढाओ’ मोहिमेचा भाग म्हणून ही योजना सुरू केली होती. या योजनेद्वारे सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींचे भविष्य समृ्द्ध व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर सरकार दरवर्षी ८ टक्के व्याज देते.

सुकन्या समृद्धी योजना ही सर्व घटकातील मुलींसाठी लागू होणारी योजना आहे. याचे खाते सुरू करताना मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. तसेच एका कुटुंबात दोन मुलींची खाती सुरू करता येतात. यामध्ये एका आर्थिक वर्षात किमान 250 रुपयांपासून ते जास्तीत जास्त 1.50 लाखापर्यंत रक्कम जमा करता येते. मुलीच्या 18 वर्षानंतर या योजनेतून 50 टक्के रक्कम शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी काढता येते. तर 21 व्या वर्षी या योजनेचा कालावधी संपतो.

Sukanya samriddhi Yojna

2000 रुपयांच्या गुंतवणुकीवर फायदा किती?

सुकन्या समृद्धी योजने प्रत्येक महिन्याला किमान 2000 रुपयांची गुंतवणूक केल्यास 15 वर्षांनी 3 लाख 60 हजार रुपये जमा होतात. यावर 8 टक्के व्याजदर पकडल्यास 21 वर्षांच्या कालावधीनंतर एकूण 7,18,898 रुपये व्याज जमा होईल. म्हणजे 21 वर्षांनी सदर मुलीला 10,78,898 रुपये मिळतील. 

पद्धतशीर गुंतवणूक योजना (Systematic Investment Plan-SIP)

एसआयपी म्हणजे पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP). म्युच्युअल फंड गुंतवणुकीत आर्थिक शिस्तीला खूप महत्त्व आहे. एसआयपी गुंतवणुकीची आर्थिक शिस्त राखण्यास मदत करते. शेअर बाजारात चढ-उतार होत असले तरी एसआयपीतून नियमित गुंतवणूक होत राहते.

एसआयपीचे फायदे (Benefits of SIP)

एसआयपीद्वारे किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. विविध आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एसआयपीचा वापर केला जातो. दीर्घ कालावधीसाठी सातत्याने लहान लहान रक्कम गुंतवून मोठा निधी उभा करता येतो. एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याची पद्धत खूपच सोपी आहे. प्रत्येक महिन्याला गुंतवणूकदाराच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर होतात. सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे गुंतवणूकदाराला कोठेही जावे लागत नाही.

फायदे- SIP  (1234 × 800mm)

एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये केली जाणारी गुंतवणूक ही शेअर मार्केटच्या तुलनेत कमी जोखीमीची मानली जाते. तसेच किमान गुंतवणुकीतून इक्विटीमध्ये गुंतवणूक करता येते. तसेच यातील ईएलएसएस फंडमध्ये गुंतवणूक केल्यास टॅक्समध्ये सवलतदेखील मिळते. चक्रवाढ व्याजाचा लाभ हा एक एसआयपीचा मोठा लाभ आहे. यामधील गुंतवणुकीच्या व्याजावर व्याज मिळते. त्यामुळे दीर्घकाळात गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. यातून कधीही पैसे काढता येतात आणि ते थेट बँकेत जमा होतात.

एसआयपीत 2000 रुपयांच्या गुंतवणुकीवर फायदा किती?

एसआयपीमध्ये प्रत्येक महिन्याला नियमितपणे 2000 रुपयांची गुंतवणूक केल्यास, 15 वर्षाने 3 लाख 60 हजार रुपये जमा होतील. त्यावर प्रत्येक वर्षाला अंदाजे 12 टक्के व्याज पकडले तर 15 वर्षांनी 6,49,152 रुपये व्याज मिळेल आणि तुमच्या 3 लाख 60 हजार रुपयांचे मूल्य 15 वर्षांनी 10,09,152 रुपये होईल.

SIP Calculator

मासिक गुंतवणूक
अपेक्षित परतावा दर
%
कालावधी
Yr
गुंतवणूक केलेली रक्कम
अंदाजे परतावा
एकूण मूल्य

तर वर आपण पाहिलेल्या दोन्ही उदाहरणामधून तुम्ही तुमचे आर्थिक उद्दिष्ट ठरवून गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते. तुमच्या प्रत्येक महिन्याच्या 2 हजारांच्या गुंतवणुकीतून तुम्ही 1000 रुपयांची एसआयपी करू शकता आणि उर्वरित 1000 रुपये सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवू शकता. यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्यपूर्ण गुंतवणूक होईल आणि त्याचा फरकही तुम्हाला समजून घेता येईल.