Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Unclaimed Money: बँक खात्यात दावा न करता पडून असलेली रक्कम परत कशी मिळवाल? जाणून घ्या

Unclaimed Bank Money

Image Source : https://www.freepik.com/

बँक खात्यांमध्ये दाव्याविना पडून राहिलेल्या रक्कमेचा आकडा 78,213 कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. खातेदाराने 10 वर्षांमध्ये बँक खात्याचा वापर न केल्यास असे खाते निष्क्रिय मानले जाते.

सरकारच्या जन धन योजनेंतर्गत देशभऱातील कोट्यावधी नागरिकांना बँक खाती उघडली. या बँक खात्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र, त्यासोबतच बँक खात्यांमध्ये दावा न करता पडून राहिलेली रक्कम देखील मोठी आहे.

अनेकदा खातेदारांच्या मृत्यूनंतर रक्कम बँकेत तशीच पडून राहते व या रक्कमेवर खातेदारांचे नातेवाईक देखील दावा करत नाहीत. सरकारी बँकांकडून अशी रक्कम आरबीआयकडे ट्रान्सफर केली जाते. फेब्रुवारी 2023 मध्ये सरकारी बँकांकडून दावा न केलेले तब्बल 35 हजार कोटी रुपये आरबीआयला देण्यात आले आहे.

आरबीआयकडून देखील दावा न केलेली रक्कम खातेदारांना परत मिळावी यासाठी पावले उचलली जात आहेत. यासाठी उदगम (UDGAM) पोर्टल सुरू करण्यात आले आहे. तुमची अथवा तुमच्या नातेवाईकांची रक्कम बँक खात्यात पडून असल्यास परत कशी मिळवू शकता, याविषयी जाणून घेऊया.

बँकांमध्ये 78 हजार कोटी रुपये पडून

बँक खात्यांमध्ये दाव्याविना पडून राहिलेल्या रक्कमेचा आकडा 78,213 कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. मार्च 2023 पर्यंत हा आकडा 62,225 कोटी रुपये एवढा होता. म्हणजेच वर्षभरात तब्बल 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

खातेदाराने 10 वर्षांमध्ये बँक खात्याचा वापर न केल्यास अथवा खात्यातील रक्कमेची देवाण-घेवाण न केल्यास असे खाते निष्क्रिय मानले जाते. या खात्यातील रक्कम बँक डिपॉजिटर एज्यूकेशन अँड अवेयरनेस फंड (DEAF) मध्ये ट्रान्सफर केली जाते. या फंडचे नियंत्रण आरबीआयकडे असते.

अनेकदा एकापेक्षा जास्त बँक खाती असल्याने काही खात्यांचा वापर होत नाही. त्यामुळे बँक खाती नियमितपणे तपासायला हवी. खात्याचा वापर करत नसल्यास त्यातील रक्कम काढून असे खाते बंद करावे. तुम्ही बँकेशी संपर्क साधून खात्याविषयी माहिती जाणून घेऊ शकता. बँक खाते निष्क्रिय होऊ नये यासाठी नियमितपणे केवायसी अपडेट प्रक्रिया पूर्ण करायला हवी.

बँकेतील दावा न केलेली रक्कम कशी परत मिळवाल?

  • तुम्ही बँकेत पडून असलेल्या रक्कमेचा दावा करण्यासाठी https://udgam.rbi.org.in/ वेबसाइटला भेट देऊ शकता. 
    येथे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा.
  • रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुन्हा लॉग इन करा.
  • त्यानंतर तुमचे नाव, बँकेची माहिती, पॅन कार्ड आणि पत्ता इत्यादी माहिती भरून सर्च पर्यायावर क्लिक करा.
  • सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्याविषयी संपूर्ण माहिती मिळले.

लक्षात ठेवा की, उदगम पोर्टलवर सध्या केवळ 30 बँकेच्या खातेदारांचीच माहिती उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त इतर बँकेत खाते असल्यास संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी करावी लागेल. बँकेत जाऊन तुम्हाला क्लेम फॉर्म भरून जमा करावा लागेल. त्यासोबत केवायसी पूर्ण करण्यासाठी इतर आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील.

खातेदाराचा मृत्यू झाला असल्यास नॉमिनी व्यक्ती देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकते. नॉमिनीचाही मृत्यू झाला असल्यास मृत्यूपत्रात ज्या व्यक्तीचा उल्लेख आहे, ती व्यक्ती या रक्कमेवर दावा करू शकते. दावा केल्यानंतर बँकेकडून 15 दिवसांच्या आत रक्कम परत दिली जाईल.