सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे, हे आता खूपच सोपे झाले आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने केवायसी (KYC) पूर्ण करून गुंतवणूक सुरु केली जाऊ शकते. एसआयपीद्वारे (SIP) म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. मार्च 2022 मध्ये एसआयपी गुंतवणूक सुमारे 12,328 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहचले आहे. SIP मध्ये गुंतवणूक करण्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 100 रुपयांपासून सुरुवात करू शकता. दीर्घ कालावधीसाठी एसआयपी (SIP) ठेवण्याचा फायदा म्हणजे गुंतवणूकदारांना चक्रवाढ व्याजाचा फायदा होतो. गेल्या 5 वर्षात 100 रुपयांच्या एसआयपीसह (SIP) काही योजनांच्या परताव्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.
100 रुपयांची एसआयपी कोणासाठी?
सर्वसामान्य माणसं शेअर्स, म्युच्युअल फंड यात गुंतवणूक करायला थोडेफार घाबरतात. अशा नवीन गुंतवणूक करणाऱ्यांनी 100 रुपयांपासून गुंतवणूक करायला काहीच हरकत नाही. तसेच महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी पुढच्या शिक्षणासाठी आतापासून गुंतवणूक केल्यास पुढील शिक्षण, लग्न यासाठी ही गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुम्हाला जर 18 वर्ष पूर्ण असतील तर तुम्ही 100 रुपयांच्या एसआयपीने दीर्घकाळासाठी गुंतवणुकीला सुरवात करू शकता. तसेच ही गुंतवणूक दरवर्षी वाढवल्यास फायदा होऊ शकतो. 100 रुपयांच्या एसआयपी पासून गुंतवणूक करता येणारे म्युच्युअल फंड पाहूया.
100 रुपयांपासून गुंतवणूक करता येतील असे म्युच्युअल फंड
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड (Nippon India Small Cap Fund)
5 वर्षांमध्ये वार्षिक रिटर्न 31.51 टक्के CAGR
1 लाख गुंतवणुकीचे मूल्य : 3.93 लाख रुपये
10000 मासिक एसआयपीचे मूल्य - 13.57 लाख रुपये
किमान गुंतवणूक - 1000 रुपये
किमान एसआयपी - 100 रुपये
मालमत्ता - 8742 कोटी (31 मार्च 2022 पर्यंत )
विस्तार प्रमाण - 0.71 टक्के (31 मार्च 2022)
आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल यूएस ब्ल्यूचिप इक्विटी फंड (ICICI Prudential US Bluechip Equity Fund)
5 वर्षांमध्ये वार्षिक रिटर्न - 18.15 टक्के CAGR
1 लाख गुंतवणुकीचे मूल्य - 2.30 लाख
10000 मासिक एसआयपीचे मूल्य - 9.32 लाख
किमान गुंतवणूक - 5000 रुपये
किमान एसआयपी - 100 रुपये
मालमत्ता - 2104 कोटी (31 मार्च 2022)
विस्तार प्रमाण - 1.08 टक्के (31 मार्च 2022)
आदित्य बिर्ला सन लाईफ डिजिटल इंडिया फंड (Aditya Birla Sun Life Digital India Fund)
5 वर्षांमध्ये वार्षिक रिटर्न - 31.51 टक्के CAGR
1 लाख गुंतवणुकीचे मूल्य - 3.93 लाख रुपये
10000 मासिक एसआयपीचे मूल्य - 13.57 लाख रुपये
किमान गुंतवणूक - 1000 रुपये
किमान एसआयपी - 100 रुपये
मालमत्ता - 8742 कोटी रुपये (31 मार्च पर्यंत )
विस्तार प्रमाण - 0.71 टक्के (31 मार्च पर्यंत )
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड (ICICI Prudential Technology Fund)
5 वर्षांमध्ये वार्षिक रिटर्न - 31.85 टक्के CAGR
1 लाख गुंतवणुकीचे मूल्य - 3.98 लाख रुपये
10000 मासिक एसआयपीचे मूल्य -14.20 लाख रुपये
किमान गुंतवणूक - 5000 रुपये
किमान एसआयपी - 100 रुपये
मालमत्ता -8742 कोटी (31 मार्च पर्यंत )
विस्तार प्रमाण - 0.71 टक्के (31 मार्च पर्यंत )
या म्युच्युअल फंडात 100 रुपयांच्या एसआयपीने (SIP) गुंतवणुकीला सुरूवात करू शकता