Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आरबीआयच्या रेपो दर वाढीनंतर फिक्स डिपॉझिटला प्राधान्य द्यावं का?

आरबीआयच्या रेपो दर वाढीनंतर फिक्स डिपॉझिटला प्राधान्य द्यावं का?

RBI Repo Rate Hiked: आरबीआयने रेपो दर वाढवल्यानंतर बँकाही व्याजदर वाढवण्याच्या तयारीत आहेत. काही बॅंकांनी आतापर्यंत 20 ते 30 बेसिस पॉईंटने दर वाढवले आहेत; फिक्स डिपॉझिटचा (मुदत ठेवी) वापर आकस्मिक निधीसाठी केला जाऊ शकतो.

RBI Repo Rate Hiked: आरबीआयने सव्वा महिन्याच्या कालावधीत दुसऱ्यांदा रेपो दर वाढवल्यानंतर बहुतांश बँका आणि नॉन बॅंकिंग वित्तीय कंपनी (NBFC) यांनी मे 2022 पासून फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात 20 ते 30 बेसिस पॉईंट्सने वाढ करत आहेत. हे दर आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन एफडी (फिक्स डिपॉझिट)मध्ये गुंतवणूक करण्यासारखी परिस्थिती आहे का? हे आपण जाणून घेणार आहोत.

फिक्स डिपॉझिट म्हणजे काय?

एखाद्या बॅंकेत किंवा नॉन बॅंकिंग वित्तीय कंपन्यांमध्ये ठराविक मुदतीसाठी ठेवलेली व त्या मुदती दरम्यान काढता न येणारी आर्थिक ठेव म्हणजे फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit). पूर्वी एफडी सर्वसामान्यांमध्ये खूपच लोकप्रिय होती. घरातील वरिष्ठ सदस्यांकडून नेहमीच एफडी करण्यासाठी सांगितले जात होते. याचे मुख्य कारण म्हणजे, फिक्स डिपॉझिटची प्रक्रिया खूपच सोपी आहे. सर्व प्रक्रिया बॅंकेद्वारे पार पाडली जाते आणि यातून निश्चित असा जोखीम मुक्त परतावा मिळतो.

फिक्स डिपॉझिटच्या व्याज दरात वाढ

आरबीआयने 4 मे रोजी, अचानकपणे रेपो दरात 40 बेसिस पॉईंटने वाढ केल्यानंतर बॅंकांनीही मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली. काही प्रमुख बँकांनी 1 वर्षाच्या एफडीवरील व्याजदर 5 टक्क्यावरून 5.10 टक्क्यापर्यंत वाढवला. 1 ते 2 वर्षांच्या कालावधीतील मुदत ठेवींचा दर 5.20 टक्के, तर 2 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी 5.25 टक्के व्याजदर केला आहे. नॉन-बॅंकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) आणि छोट्या बँका या काही प्रमुख बँकांपेक्षा अधिक परतावा देतात; पण यात धोका ही तितकाच जास्त असतो. त्यामुळे प्रमुख व आघाडीच्या बॅंकांमध्ये मुदत ठेवीद्वारे गुंतवणूक करण्याचा सल्ला अनेक आर्थिक सल्लागार देतात.


फिक्स डिपॉझिटच्या परताव्यावर कर आकारणी

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाच्या वाढत्या किमती आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 8 जून रोजी रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ करून रेपो दर 4.9 टक्के केला. दरम्यान, आरबीआयच्या या निर्णयानंतर फिक्स डिपॉझिटचे व्याज दर कितीही आकर्षक दिसत असले तरी, गुंतवणूकदारांना करोत्तर परताव्याच्या चांगल्या रिटर्न्ससाठी मुदत ठेवींपेक्षा डेब्ट फंड निवडण्याचा सल्ला दिला जातो. कारण एफडींवर (Fixed Deposit) मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जातो. जर तुम्ही 30 टक्के डेब्ट फंडाच्या उच्च टॅक्स ब्रॅकेटमध्ये येत असाल तर तुम्ही निश्चितपणे याची निवड करू शकता. कारण तुम्ही दीर्घकालीन भांडवली नफ्यावर निर्देशांक सूचीनुसार लाभ घेऊ शकता.

आपत्कालीन निधी उभारण्यासाठी एफडी योग्य आहे का?

2020 मधील कोरोनाचा काळ हा सर्वांसाठी सर्वच बाबतीत धडा देणारा काळ होता. याकाळात आपत्कालीन निधी (Emergency Fund) किती आवश्यक आहे, याचे महत्त्व अनेकांना पटले. आपत्तीजनक परिस्थिती कोणावरही आणि कधीही येऊ शकते. त्यामुळे आपत्कालीन निधी उभारण्यासाठी एफडी करावी की डेब्ट फंडाचा विचार करावा का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. याबाबत फिनफिक्सचे संस्थापक प्रबलीन बाजपेयी सांगतात की, गुंतवणूकदारांनी परतावा किती मिळणार आहे, हे पाहून गुंतवणूक करू नये. गुंतवणूक करताना गुंतवणुकीची उद्दिष्ट्ये काय आहेत? याचा सारासार विचार करून गुंतवणुकीचे पर्याय निवडावेत. एखाद्याचा आकस्मिक निधी त्याच्या प्राधान्यक्रमानुसार लिक्विड फंड किंवा फिक्स डिपॉझिट ही असू शकतो.

समजा, एखाद्याला त्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 5 ते 7 वर्षांत पैशांची गरज लागणार असेल तर त्याने टार्गेट मॅच्युरिटी डेब्ट फंडाचा विचार करावा, असा सल्ला देवांग शहा, अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाचे सह-प्रमुख आणि फिनफिक्सचे संस्थापक प्रबलीन बाजपेयी देतात. अशा फंडामध्ये टप्प्याद्वारे किंवा वेगवेगळ्या भागात गुंतवणूक करता येते. तसेच 1 ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर अल्ट्रा-शॉर्ट किंवा कमी कालावधीच्या गुंतवणूक पर्यायांचा विचार करा. जिथे तुमचा पोर्टफोलिओ बदलत्या व्याजदराशी लगेच जुळवून घेऊ शकेल.