Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ठेवीदारांसाठी गुड न्युज, मुदत ठेवींवर आता अधिक व्याज

interest rate repo rate

RBI Repo Rate Hike : व्याजदरातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा कर्जदार आणि ठेवीदारांवर अधिक होतो. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या पतधोरणातील निर्णयाने व्याजाबाबतचं गणित जरासं बदललंय.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank Of India) बुधवारच्या (दि. 8 जून) पतधोरणात रेपो दरामध्ये वाढ (Repo Rate Increase 2022) झाली. सव्वा महिन्यात दुसऱ्यांदा आणि एकूण जवळपास एक टक्क्यापर्यंतची ही वाढ झाली. मध्यवर्ती बँक अन्य व्यापारी बँकांकरीता अल्पकालीन निधी उपलब्धततेसाठी आकारात असलेल्या निधीवरील व्याज म्हणजेच रेपो दर (Repo Rate) आहे. रिझर्व्ह बँक रेपो दर वाढविणार म्हणजे बँकांना अधिक व्याज द्यावं लागणार आणि मग बँका ते ग्राहक, खातेदारांकडून वसूल करतं.

रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढविल्यामुळे बँका आता कर्जावरील व्याजदराबरोबरच ठेवींवरही अधिक व्याज देतील. प्राधान्याने 1 ते 3 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः 60 वर्षांवरील व्यक्तींसाठी (Senior Citizen) बँकेतील मुदत ठेवींवर अधिक व्याज मिळेल. त्याचबरोबर अनेक बँका या अतिज्येष्ठ म्हणजे 80 वर्षांवरील खातेदारासांठीही अतिरिक्त व्याज लागू करतात.


सध्या 1 ते 2 वर्षाच्या मुदतीवरील ठेवींवर काही निवडक बँका अधिक व्याज देत आहेत. आरबीएल (RBL Bank) या खासगी बँकेचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा एफडी रेट (Fixed Deposit Rate) हा वार्षिक सर्वाधिक 6.75 टक्के आहे. तर देशातील सर्वात मोठी बॅंक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींवर 5 टक्क्यांपर्यंत व्याज देते. ज्येष्ठांच्या मुदत ठेवीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्यांमध्ये खासगी बँकांचा क्रम वरचा आहे.

अनेक वाणिज्यिक बँका (Commercial Banks) आणि नॉन बँकिंग वित्त कंपन्यांनी (Non-Banking Finance Company) मे, 2022 पासून आतापर्यंत मुदत ठेवींवरील व्याज 0.20 ते 0.30 टक्के वाढविले आहे. 1 ते 2 वर्षे अशा अल्प मुदतीसाठीच्या ठेवींवरील व्याजदरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काही आघाडीच्या बँकांनी त्यांचा 1 वर्षाच्या कालावधीतील व्याजदर 5 टक्क्यांवरून 5.10 टक्क्यांपर्यंत नेला आहे. तर 1 वर्षापेक्षा अधिक आणि 2 वर्षांपेक्षा कमी मुदतीसाठी व्याजदर 5.20 टक्के आहे. 2 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक व्याजदर 5.25 टक्के आहे. खासगी बॅंका, या नियमित बॅंका आणि एनबीएफसी (नॉन बँकिंग वित्त कंपन्या) पेक्षा जास्त व्याज देतात. तसेच त्याचे कर्जाचे व्याजदरही अन्य, सरकारी बँकांच्या तुलनेत अधिक असतात.

मुदत ठेवी म्हणजे काय? | What is Fixed Deposit?

ग्राहक निश्चित कालावधीसाठी आणि निश्चित व्याजदरासाठी बँकेत मुदत ठेवी अंतर्गत विशिष्ट निधी ठेवू शकतात. ही रक्कम बँकेकडे सुरक्षित राहते. या रकमेवर कालावधी आणि रकमेप्रमाणे वार्षिक व्याज दिले जाते. महिला, ज्येष्ठ नागरिक अशा वर्गवारीतही व्याजाचा दर वेगवेगळा असतो. बँक अशाप्रकारे जमा झालेल्या रकमेचा वापर कर्ज वितरणासाठी करत असते.

मुदत ठेवीची वैशिष्ट्ये | Features of Fixed Deposit

  • मुदत ठेवींना 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण आहे.
  • मुदत ठेवींमधून 90 टक्क्यांपर्यंत कर्ज घेता येते.
  • आपत्कालीन स्थितीत मुदत ठेव मोडून रक्कम मिळविता येते.


ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवींवर टीडीएस | TDS on Senior Citizens FD

ज्येष्ठ नागरिकांच्या बँकेतील मुदत ठेवीवर कराची मात्रा काही प्रमाणात लागू आहे. 50 हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी करमुक्त आहे. मात्र, त्यावरील रकमेवर 10 टक्के टीडीएस (TDS) लागू होतो. ज्येष्ठ नागरिक प्राप्तीकराच्या कोणत्याच कर टप्प्यात (Tax Slab) येत नसेल तर कर वजावटीसाठी त्याला Form 15H भरून द्यावा लागतो.

आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यामुळे अनेक बॅंकांची गृह, वाहन, वैयक्तिक कर्जे महागली, हे खरं आहे! पण त्याचबरोबर बँकेत ठेवलेल्या मुदतठेवींवरील व्याजदर ही वाढले आहेत. यामुळे तुमच्या इतर पारंपरिक गुंतवणुकीवर तुम्हाला अधिक परतावा मिळू शकतो. पण बऱ्याच गुंतवणुकीवरील परतावा हा करपात्र असल्याने अधिकृत आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्या.