Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI Home Loan Offer: स्वस्त गृहकर्जासाठी SBI ची 'कॅम्पेन रेट' ऑफर नक्की जाणून घ्या, 31 मार्च असणार अंतिम मुदत

SBI Home Loan Offer

Image Source : www.logolook.net.com

SBI Home Loan Offer: तुम्हीही सर्वात स्वस्त गृहकर्ज शोधत असाल तर, आजच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या(SBI) 'कॅम्पेन रेट(Campaign Rates)' ऑफरबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

SBI Home Loan Offer: घराचे स्वप्न साकार करायचे असेल, तर बऱ्याच वेळा बँका आपल्याला मदत करतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने(RBI) रेपो दरात वाढ केल्यानंतर गृहकर्ज(Home Loan) अतिशय महाग झाले आहे. अशा परिस्थितीत तुम्ही स्वस्तात गृहकर्ज देणाऱ्या बँकेची माहिती शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाने(SBI) सर्वात स्वस्त गृहकर्जासंदर्भात एक ऑफर आणली आहे. चला तर याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

स्टेट बँक ऑफ इंडियाची 'कॅम्पेन रेट(Campaign Rates)' ऑफर

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI) आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. हीच बँक तुमच्यासाठी सर्वात स्वस्त गृह कर्ज ऑफर घेऊन आली आहे. SBI च्या या नवीन ऑफरला 'कॅम्पेन रेट(Campaign Rates)' असे नाव दिले आहे. या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना गृहकर्ज दरांवर 30 ते 40 बेसिस पॉइंट्स म्हणजेच सोप्या शब्दात समजून घ्यायचे तर, 0.30 ते 0.40 टक्के सूट दिली जात आहे. ही ऑफर 31 मार्च 2023 पर्यंत वैध असून नवीन ऑफर अंतर्गत, बँक ग्राहकांना नियमित गृहकर्जावर 8.60 टक्के व्याजदर देणार आहे. केवळ ही एकच सवलत नाही तर SBI ने नियमित आणि टॉप-अप गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्क देखील माफ केले आहे.

नियमित गृहकर्जावर 30 ते 40 bps टक्क्यांची सूट

SBI नियमित गृहकर्जावर जास्तीत जास्त 30 ते 40 bps म्हणजेच 0.30 ते 0.40 टक्के सूट देत आहे. ही सवलत ज्यांचा क्रेडिट स्कोअर 700 ते 800 किंवा त्याहून जास्त आहे अशा ग्राहकांसाठी आहे. SBI च्या कॅम्पेन रेट ऑफर अंतर्गत गृहकर्जाचा दर 8.60 टक्के असणार आहे.

ऑफर नक्की काय आहे?

  • सामान्यपणे 800 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअरवर 8.90 टक्के दराने 30 bps ची सूट दिली जाते 
  • क्रेडिट स्कोअर 750 ते 799 असेल तर तुम्हाला 9 टक्क्यांऐवजी 8.60 टक्के व्याजदराने गृहकर्ज मिळणार आहे 
  • 700 ते 749 क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना 9.10% ऐवजी 8.70% दराने गृहकर्ज SBI बँक देणार आहे 
  • विशेष म्हणजे महिला आणि पगार खातेदारांसाठी 5 bps ची अतिरिक्त सूट देण्यात येत आहे 
  • पगार खातेधारकांना विशेषाधिकार आणि Apon Ghar योजनांतर्गत 5 आधारभूत गुणांची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे