Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI Festive Home Loan Offer : कमी व्याजदरात गृहकर्जाची ऑफर

SBI Festive Home Loan Offer

स्टेट बँक ऑफ इंडियाची होम लोन ऑफर सुरू आहे. 31 जानेवारी 2023 पर्यंत ही ऑफर राहणार आहे. या कालावधीत कमी व्याजदर मिळवण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे

स्टेट बँक ऑफ इंडियाची होम लोन ऑफर सुरू आहे. 31 जानेवारी 2023 पर्यंत ही ऑफर राहणार आहे. या कालावधीत कमी व्याजदर मिळवण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. 

स्वत:चे घर घ्यायचे म्हणजे बरेचदा कर्ज घेऊनच हे स्वप्न पूर्ण कराव लागते. यासाठी कमीत कमी व्याज कस भराव लागेल, याचा विचार केला जातो. यादृष्टीने या ऑफरचा इच्छुकांना विचार करता येईल. 4 ऑक्टोबरपासून SBI festive home loan offer ला सुरुवात झाली. 31 जानेवारिपर्यंत याचा फायदा ग्राहकांना घेता येईल. होम लोनचे व्याजदर 8.40 टक्के इतके आहे. बँकेने रेग्युलर होम लोन आणि टॉप-अप लोनसाठी प्रोसेसिंग फी माफ केली आहे. 

तुमचा सिबिल स्कोअर ठरणार महत्वपूर्ण (CIBIL Score)

याबाबत आणखी एक लक्षात घ्यायची बाब म्हणजे सिबिल स्कोअर. SBI चे होम लोनचे दर सिबिल स्कोअरच्या आधारावर वेगवेगळे असतात. त्यामुळे क्रेडिट स्कोअर जितका चांगला असेल त्याप्रमाणात होम लोनवरील व्याजदर कमी राहतील. यामुळे या ऑफरचा लाभ उठवण्याचा विचार करत असाल तर तुमचा सिबिल स्कोअर नक्की चेक करा. कर्ज घेणारी जर महिला असेल तर तिला यात अधिक सवलत मिळणार असल्याचे एसबीआयने याविषयी स्पष्ट केले आहे. 

टॉपअप होम लोन (Top up home loan)

एसबीआय 700 ते  800 हून  अधिकच्या  क्रेडिट स्कोरवर  15 बेसिस पॉइंटची सूट देत आहे. क्रेडिट स्कोर 800 किवा त्याहून  अधिक असेल तर एसबीआयचा सामान्य दर 8.95% ते  8.80% इतका आहे. 750 – 799 स्कोर वर 9.05% ते 8.90% आणि 700 -749 स्कोरवर 9.15% ते 9% आहे. 650 – 699 च्या सिबिल स्कोरवर 9.25%, 550 – 649 च्या स्कोरवर 9.55% असे दर आहेत.  

आणखी दोन महिने SBI होम लोन ऑफर घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या ऑफर कालावधीत आणखी कोणतीही सवलत उपलब्ध लागू होणार नसल्याचे SBI ने स्पष्ट केले आहे. या ऑफर दरम्यान नियमित आणि टॉप अप होम लोनवर फी लागणार नसल्याचेही बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र ही सवलत  मालमत्तेच्या बदल्यात होम लोनसाठी लागू असणार नाही. मालमत्तेच्या बदल्यात होम लोनसाठी 10 हजार रुपयाचे एक फ्लॅट प्रोसेसिंग फी आणि लागू असलेला जीएसटी लावण्यात आला आहे.