Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Russia Gas Pipeline : युरोपला वायू इंधन पुरवण्यासाठी रशिया तयार 

Russia Pipe Gas

Image Source : www.earthjustice.org

Russia Gas Pipeline : रशियाने युरोपला वायू इंधन पुरवठा पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. रशिया - युक्रेन युद्धामुळे हा पुरवठा खंडित झाला होता. पण, आता रशियालाही परकीय चलनाची गरज आहे. आणि युरोपला इंधनाचा तुटवडा जाणवतोय, त्यामुळे ही चर्चा पुन्हा सुरू झालीय.

रशियाने यमल - युरोप (Yamal - Europe Pipeline) वायू इंधन (Gas) पाईपलाईन पुन्हा सुरू करण्याची तयारी दाखवली आहे. याच पाईपलाईनमधून रशियाकडून (Russia) युरोपला वायू इंधन (Fuel Gas) पुरवलं जातं. ‘युरोपला इंधनाची गरज आहे . आणि आमची ते पुरवण्याची तयारी आहे,’ असं रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक (Alexander Novak) यांनी म्हटलं आहे.   

रशियातल्या TASS या वृत्तसंस्थेनं तशी बातमी दिली आहे. ‘युरोपमध्ये सध्या इंधन तुटवडा वाढतोय. आणि आमच्यासाठी ती महत्त्वाची बाजारपेठ आहे ,’ असं नोवाक यांनी म्हटल्याचं TASS वृत्तसंस्थेनं आपल्या रिपोर्टमध्ये लिहिलंय. रशिया युरोपला कशी मदत करू शकते, यावर नोवाक म्हणतात, ‘यामल - युरोप गॅस पाईप लाईन राजकीय कारणांमुळे बंद आहे. ती सुरू करून.’  

यामल - युरोप गॅस पाईपलाईन काय आहे? What is Yamal - Europe Pipeline?  

रशिया हा जगातला सगळ्यात मोठा वायू इंधनाचा पुरवठादार देश आहे. आणि रशियाची 60% इंधन बाजारपेठ युरोप हीच आहे. या पाईपलाईनमधून रशिया युरोपला इंधन पुरवठा करतो. पण, युक्रेनबरोबरचं युद्ध सुरू झाल्यावर युरोपीय देश आणि अमेरिकेनं रशियावर निर्बंध लादले. आणि त्यांच्याकडून इंधन खरेदी करणं कमी केलं. त्यांना इंधनासाठी द्यायच्या मोबदल्यावरही बंधनं आणली.   

त्यामुळे रशियाचीही पंचाईत झाली आहे. तर युरोपला इंधनाचा तुटवडा जाणवू लागला आहे.   

रशियातून पोलंड मार्गे ही पाईप लाईन युरोपात जाते. पण, पोलंडने सध्या रशियाकडून इंधन घेणं नाकारलंय. आणि ते जर्मनीकडून इंधन घ्यायला लागले. त्यावरून रशिया आणि पोलंड दरम्यान छोटसं व्यापारी युद्धही सध्या सुरू आहे.   

पण, आता रशियाने सबुरीचं धोरण स्वीकारलं आहे. आणि पोलंड ऐवजी यामल - युरोप पाईप लाईन द्वारे तुर्कीएमधून इंधन पुरवठा करण्याची तयारीही चालवली आहे. रशियातून इंधन आयात करण्यावर सध्या निर्बंध असले तरी रशियाने युरोपला 2022 मध्ये 19.4 bcm इतका LPG वायू पुरवला असल्याचं अलेक्झांडर नोवाक यांनी म्हटलं आहे.