Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Personal Finance Deadline: जून महिन्यातील या 6 डेडलाईन आठवणीने पाळा; नाहीतर नुकसान अटळ

Personal Finance Deadline in June

Personal Finance Deadline: तुमच्या पर्सनल फायनान्सला धरून जून महिन्यामध्ये काही महत्त्वाच्या डेडलाईन आहेत. ज्यामुळे तुमचा आर्थिक फायदा होऊ शकतो आणि त्या पाळल्या नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते. चला तर या कोणत्या डेडलाईन आहेत, पाहुया.

Money Deadline in June: जूनचा महिना येण्यासाठी अगदी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मुलांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याबरोबच तुमच्या पर्सनल फायनान्सशी संबंधित काही डेडलाईनसुद्धा जूनमध्ये आहेत. ते पूर्ण करून घ्या नाहीतर तुम्हाला त्याचा आर्थिक फटका बसू शकतो. चला तर मंडळी जून महिन्यात अशा कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ज्या वेळेत पूर्ण केल्या नाही तर आर्थिक नुकसान होऊ शकते.

पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक डेडलाईन (Aadhar-Pan Card Link)

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (Central Board of Direct Taxes-CBDT) मंडळाने पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून, 2023 पर्यंत वाढवली आहे. ज्यांनी 2017 मध्ये पॅनकार्ड काढलेले आहे; आणि त्यांच्याकडे आधारकार्ड सुद्धा आहे. ते 1000 रुपये फी भरून 30 जून पर्यंत लिंक करून घेऊ शकतात. 30 जून नंतर ही सुविधा बंद होणार असून, ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांचे पॅनकार्ड निष्क्रिय केले जाणार आहे.

हायर ईपीएफओ पेन्शन (Higher EPFO Pension)

कर्मचार भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने हायर EPFO पेन्शनचा पर्याय निवडण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. ईपीएफओने ही डेडलाईन 26 जून, 2023 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी पीएफ ऑफिसने ही मुदत 3 मे ठरवली होती. पण त्या मुदतीत अनेकांना तिची निवड करता आली नाही. त्यामुळे पीए ऑफिसने त्याची मुदत पुन्हा वाढवली आहे. आतापर्यंत 12 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांनी हायर पेन्शनसाठी अर्ज केला आहे.

फ्री आधार अपडेट डेडलाईन (Free Aadhar Update)

युनिक आयडेंटीफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (UIDAI)ने ज्या नागरिकांनी अगदी सुरूवातीला आधारकार्ड काढले होते. त्यांना ते अपडेट करण्याच्या सूचना केल्या आहेत. आधारकार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया 15 मार्चपासून सुरू झाली असून ती 14 जूनपर्यंत सुरू असणार आहे. 14 जूनपर्यंत आधारकार्डमधील माहिती अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आधारकार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा ही फक्त ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध आहे. जे नागरिक प्रत्यक्ष आधारकार्ड केंद्रावर जाऊन आधारकार्ड अपडेट करतील त्यांना 50 रुपये शुल्क द्यावे लागणार.

बँक लॉकर अ‍ॅग्रीमेंट डेडलाईन (Bank Locker Agreement)

रिझर्व्ह ऑफ बँक ऑफ इंडियाने बँकांना लॉकर अ‍ॅग्रीमेंटच्या नुतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर, 2023 पर्यंतची मुदत दिली आहे. आरबीआयने बँकांना 30 जून, 2023 पर्यंत 50 टक्के आणि 30 सप्टेंबर, 2023 पर्यंत 75 टक्के प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य दिले आहे.

इंडियन बँक स्पेशल मुदत ठेव योजना (Indian Bank Special FD)

इंडियन बँकेने ग्राहकांसाठी IND Super 400 Days ही स्पेशल मुदत ठेव योजना (Special Fixed Deposit Scheme) आणली होती. या मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची मुदत 30 जून, 2023 पर्यंत वाढवण्यात आली. या योजनेंतर्गत इंडियन बँक सर्वसामान्य ग्राहकांना 7.25 टक्के व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के आणि अतिज्येष्ठ नागरिकांना 8 टक्के व्याजदर देत आहे.

एसबीआय अमृत कलश योजना (SBI Amrit Kalash Scheme)

स्टेट बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा अमृत कलश (Amrit Kalash) योजना आणली आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची मुदत 30 जून, 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. एसबीआय बँकेच्या वेबसाईटवर दिल्यानुसार, 400 दिवसांच्या स्कीमवर सर्वसामान्या ग्राहकांना 7.10 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदर दिला जाणार आहे.