Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Aadhar Free Update: या तारखेपर्यंत आधारकार्ड फ्रीमध्ये करता येणार अपडेट! त्यानंतर भरावे लागणार इतके शुल्क

Aadhar Free Update

Image Source : www.cnbctv18.com

Aadhar Free Update: युनिक आयडेंटीफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) प्रत्येक 10 वर्षांनी आधारकार्ड अपडेट करण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या आहेत. UIDAI ने 15 मार्चपासून ही प्रक्रिया सुरू केली असून ती 14 जूनपर्यंत चालणार आहे. तसेच 14 जूनपर्यंत जे नागरिक आधारकार्ड ऑनलाईन अपडेट करणार आहेत. त्यांना त्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

Aadhar Free Update: ज्या नागरिकांच्या आधारकार्डला 10 वर्षे किंवा त्याहून अधिक वर्षे झाली आहेत; त्यांना आधारकार्ड अपडेट करून घेण्याच्या सूचना युनिक आयडेंटीफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) म्हणजेच आधार यंत्रणेने केल्या आहेत. जे नागरिक 14 जून, 2023 पर्यंत आधार अपडेट करतील, त्यांना ही सुविधा मोफत उपलब्ध असणार आहे. 14 जूननंतर आधार अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे; त्यांना ते दोनप्रकार अपडेट करता येऊ शकते. एक ऑनलाईन पद्धतीने आणि दुसरे ऑफलाईन पद्धतीने. ऑनलाईन पद्धतीने म्हणजे अगदी घरातून आधारकार्ड अपडेट करता येते. ऑनलाईन आधारकार्ड अपडेट करण्यासाठी संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. अन्यथा ऑनलाईन आधारकार्ड अपडेट करता येत नाही. ज्यांचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक आहे. ते फोटो आयडी आणि पत्त्त्याचा पुरावा अपलोड करून आधारकार्डमध्ये अपडेट करू शकतात.

10 वर्षांनी आधार अपडेट करणे आवश्यक

युनिक आयडेंटीफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) प्रत्येक 10 वर्षांनी आधारकार्ड अपडेट करण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या आहेत. आधारकार्डमध्ये नाव (Name), पत्ता (Address), जन्मतारीख (Birthdate), लिंग (Gender), मोबाईल क्रमांक (Mobile Number) आणि ईमेल (E-mail) अपडेट करता येतो.

आधारकार्डमधील हे अपडेट ऑनलाईन केले तर त्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. पण ऑफलाईन आधारकार्ड केंद्रावर जाऊन हे अपडेट केले तर त्यासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाते. तसेच आधारकार्डमधील बायोमेट्रिक अपडेटसाठी प्रत्यक्ष आधारकार्ड केंद्रावरच जावे लागते आणि त्यासाठी 100 रुपये शुल्क भरावे लागते.

ऑनलाईन फ्री तर ऑफलाईन 50 रुपयांत करा अपडेट

UIDAI ने नोटिफिकेशन काढल्यानुसार, नागरिकांना 14 जूनपर्यंत ऑनलाईन आधारकार्ड अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. पण 14 जूननंतर मात्र ऑनलाईन अपडेटसाठीही पैसे भरावे लागणार आहेत. तसेच ऑफलाईन आधार केंद्रावर जाऊन आधारकार्ड अपडेट केल्यास त्यासाठी 50 रुपये शुल्क आकारले जात आहे.

आधारकार्ड असे ऑनलाईन अपडेट करा

आधार कार्डवरील पत्ता, नाव, जन्मतारीख आणि लिंग हे ऑनलाईन बदलण्यासाठी किंवा दुरूस्त करण्यासाठी खालील स्टेपचा वापर करा.

  • सर्वप्रथम आधारच्या UIDAI वेबपोर्टलला भेट द्या.
  • वेबसाईटवरील Proceed to update Address यावर क्लिक करा.
  • तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. कॅप्चा कोड टाका.
  • तुमच्या अधिकृत मोबाईलवर ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून लॉग-इन करा.
  • आता इथे सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन सबमिट करा.
  • तुमच्याकडे पत्त्याचा आवश्यक पुरावा नसेल तुम्हाला Request for Address Validation Letter ही प्रक्रिया पार पाडावी लागेल.
  • यात आधार कार्डवरील पत्ता अपडेट करण्याची विनंती करून त्यानंतर आधारमधील पत्ता अपडेट केला जातो.


आधारकार्ड अपडेट करण्यासाठी पुरावा

  • पोस्टाचे / बॅंकेचे पासबुक
  • पासपोर्ट
  • रेशन कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • विजेचे / पाण्याचे / गॅसचे / टेलिफोनचे बिल
  • प्रॉपर्टी टॅक्सची पावती
  • इन्श्युरन्स पॉलिसी
  • नरेगा जॉब कार्ड
  • किसान पासबुक