Link PAN-Aadhar: पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) यांनी मागील आठवड्यात आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक नसलेल्यांना एनपीएसचे खाते हाताळता येणार नसल्याचा इशारा दिला आहे. याबाबत पेन्शन फंड प्राधिकरणाने 2 मे रोजी एक परिपत्रिक काढून खातेधारकांना लवकरात लवकर आधारकार्ड-पॅनकार्ड लिंक करण्याबाबत सूचित केले आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CEntral Board of Direct Taxes-CBDT) कार्यालयाने पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्याची मुदत 30 जून 2023 पर्यंत वाढवली आहे. याला धरूनच पेन्शन फंड प्राधिकरणाने एनपीएस खातेधारकांना 30 जून पर्यंत आधारकार्ड-पॅनकार्ड लिंक करण्याच्या सूचना केल्या आहेत. जे खातेदार या तारखेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत. त्यांना एनपीएसचे खाते वापरता येणार नाही. पॅनकार्ड हे गुंतवणूक आणि टॅक्सच्या संदर्भातील महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. तसेच एनपीएस खात्याच्या केवायसीसाठी सुद्धा पॅनकार्ड आणि आधारकार्ड ही महत्त्वाची कागदपत्रे आहेत. त्यामुळे ज्या खातेधारकांनी अजूनही पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक केलेले नाही. त्यांनी 30 जून, 2023 पर्यंत ते करून घ्यावे. जे खातेधारक ही प्रक्रिया करणार नाही. त्या खात्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार नाही.परिणामी केवायसी न झालेली खाती ग्राहकांना वापरता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर आधारकार्ड-पॅनकार्ड लिंक करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
30 जूनपर्यंत मुदत वाढवली
सीबीडीटीने 28 मार्च रोजी आधारकार्ड-पॅनकार्ड लिंक करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवली आहे. ही मुदत इन्कम टॅक्स विभागाने आतापर्यंत 5 वेळा वाढवली आहे. पण या तारखेपर्यंतही ग्राहकांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांच्या कडक कारवाई करण्याचा इशारा इन्कम टॅक्स विभागाने दिला आहे.
इन्कम टॅक्स विभागाने ज्या ग्राहकांनी 1 जुलै, 2022 नंतर आधारकार्ड-पॅनकार्ड लिंक करण्यासाठी 1,000 रुपये फी निश्चित केली आहे. तसेच इन्कम टॅक्स कायद्यातील तरतुदीनुसार ज्यांच्याकडे 1 जुलै 2017 पर्यंत ज्यांच्याकडे पॅनकार्ड आणि आधारकार्ड असे दोन्ही कार्ड आहेत. त्यांनी 31 मार्च, 2023 पर्यंत ठरलेली फी भरून पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक करणे गरजेचे होते. पण आता ज्यांनी 31 मार्च, 2023 ही तारीख सुद्धा मिस केली आहे. ते दंडाची रक्कम भरून 30 जूनपर्यंत आधारकार्ड-पॅनकार्ड लिंक करू शकतात.
दंड भरून आधारकार्ड-पॅनकार्ड लिंक कसे करायचे?
- इन्कम टॅक्स विभागाच्या साईटवर जा. तिथे Link Aadhar यावर क्लिक करा.
- तुमच पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक टाकून तो व्हेरिफाय करून घ्या.
- त्यानंतर दंडाची रक्कम भरून तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.