फिक्स्ड डिपॉझिट स्कीमच्या (Fixed Deposit Scheme) अंतर्गत तुम्हाला सुरक्षित आणि हमी परतावा मिळत असतो. एफडी हे गुंतवणुकीचं एक विश्वासार्ह माध्यम आहे. त्यातही जर हा पर्याय सरकारी बँकेत मिळत असेल तर या सुवर्णसंधीचा लाभ नक्कीच घ्यायला हवा. ही एक विशेष रिटेल मुदत ठेव योजना आहे. अमृत कलश या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के दरानं परतावा मिळतो. 400 दिवसांच्या मुदतीच्या योजनेत पैसे गुंतवून 7.1 टक्के व्याजदर मिळतो.
Table of contents [Show]
मुदतपूर्व पैसे काढता येणार
एसबीआयची अमृत कलश ही विशेष रिटेल मुदत ठेव योजना आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के दराने परतावा मिळतो. यामध्ये 400 दिवसांच्या मुदतीच्या योजनेत पैसे गुंतवून तुम्हाला 7.1 टक्के व्याजदर मिळतो. या योजनेनुसार घरगुती ठेवी आणि एनआरआय मुदत ठेवींसाठी जास्तीत जास्त 2 कोटी रुपयांची एफडी केली जाऊ शकते. महत्त्वाचं म्हणजे मुदतपूर्व पैसे काढण्याची त्याचप्रमाणं कर्जाची सुविधादेखील यात मिळते.
Looking for Regular Fixed Income
— Stock Precision (@Stock_Precision) April 16, 2023
? Invest in SBI Amrit Kalash FD
? Details
- Interest Rates : 7.1%
- Interest Rates for Senior Citizens : 7.6%
- Tenure : 400 Days (13 Months)
- Validity : 12th April 2023- 30th June 2023
- Interest Paid : Monthly, Quarterly, Semi Annual
- TDS…
योजनेचा कालावधी
अमृत कलश ही एफडी योजना 12 एप्रिल 2023 ते 30 जून 2023 या कालावधीपर्यंत गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आलीय. यापूर्वी एसबीआयनं 15 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत ती लाँच केली होती. थोडक्यात याची मुदत पुन्हा एकदा वाढवली किंवा ही संधी पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना एसबीआयनं देऊ केलीय.
व्याज दर काय?
या योजनेंतर्गत, दर महिन्याला, दर तीन महिन्याला, प्रत्येक सहामाही कालावधीत व्याज मिळतं. एफडीचं व्याज पेमेंट तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठरवू शकता. कार्यकाळ संपल्यानंतर खातेदाराच्या खात्यात एफडीचे हे पैसे हस्तांतरित केले जातात. मिळालेल्या परताव्यावर तुम्हाला तुमच्या आयकर स्लॅबनुसार टीडीएस भरावा लागणार आहे. सध्या 400 दिवसांच्या कालावधीवर 7.1 टक्के परतावा मिळतो. ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेच्या माध्यमातून एफडी केली तर 7.6 टक्के दरानं व्याज मिळतं.
कशी करावी गुंतवणूक?
अमृत कलश या योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करावा लागेल. नेटबँकिंग आणि एसबीआय योनो (SBI YONO) अॅपच्या माध्यमातूनदेखील ही प्रक्रिया करता येईल. या माध्यमातून कर्जही घेता येवू शकेल. तर मॅच्युरिटी होण्यापूर्वीच तुम्हाला त्यातून पैसे काढता येवू शकतील. शकता.