रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, नवीन बँक लॉकर (Bank Locker) नियम 1 जानेवारी 2023 पासून काही नियम लागू केले आहेत.
बँक लॉकर संदर्भातले नवे नियम काय सांगतात?
1 जानेवारी 2023 पर्यंत ग्राहकांना बँक लॉकर कराराचे नूतनीकरण करण्यास सांगितले गेले होते. परंतु अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचे आरबीआयच्या निदर्शनास आले आहे. ज्यांनी कराराचे नूतनीकरण केलेले नाही आणि वर्षातून एकदाही लॉकर उघडलेले नाही अशा ग्राहकांचे लॉकर उघडण्याची परवानगी बँकांना देण्यात आली आहे. यासाठी बँकांना लॉकर करारामध्ये नमूद असलेल्या प्रोटोकॉलचा वापर करूनच ते उघडण्याची परवानगी परवानगी देण्यात आली आहे.
लॉकर करार कसा कराल?
लॉकर करारासाठी ग्राहकाला प्रत्यक्ष बँक शाखेला भेट द्यावी लागेल. बँकेच्या नियमानुसार जर ग्राहक सदर सेवेसाठी सक्षम असेल तर त्यांना ही सुविधा दिली जाते. या सुविधेचे शुल्क प्रत्येक बँकेसाठी वेगवेगळे आहे. बँकेला या विशेष सेवेसाठी अर्ज करावा लागतो, त्यात आवश्यक ती माहिती पुरवावी लागते. KYC अपडेट वेळोवेळी करावे लागतात.
बँकेची जबाबदारी
बँक लॉकरची सुरक्षितता ही बँकेचे जबाबदारी आहे. नियमांनुसार, लॉकर धारकाला नैसर्गिक कारणामुळे लॉकरमधील सामग्रीचे नुकसान किंवा तोटा झाल्यास नुकसान भरपाई देण्यास बँक जबाबदार नाही असे म्हटले आहे. परंतु, आग, चोरी, इमारत कोसळणे किंवा कर्मचार्यांची हलगर्जी यासारख्या घटनांमुळे नुकसान झाल्यास, बँक लॉकरधारकाला भरपाई देईल.